मुंबई : भारताची स्टार आणि दिग्गज महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने अखेर टेनिसच्या कारकीर्दीला ब्रेक दिला आहे. तिने निवृत्त होणार असल्याची घोषणा इंन्टाग्राम पोस्टवरून आधीच केली होती. तिचं ग्रॅण्डस्लॅम मिळवण्याचं स्वप्नही अधूरं राहिलं. त्यापाठोपाठ आता दुबई ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिप महिला डबल्समध्ये देखील तिला पराभवाचा सामना करावा लागला. करियरमधील शेवटची टूर्नामेंट जिंकवी हे तिचं स्वप्न अधूरंच राहिलं. गेल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने ही टेनिस स्टार बाहेर पडली आहे. पराभवानंतर टेनिस कोर्ट सोडताना शेवटच्या सामन्यानंतर ती खूप भावुकही झाली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने निवृत्ती घेतली. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला निरोप दिला.
टेनिसमधील निवृत्तीनंतर सानिया मिर्झाची क्रिकेटमध्ये एंट्री, RCB संघाने दिली मोठी जबाबदारीOne final embrace 🫂@MirzaSania has played her final match, wrapping up her career in Dubai!#DDFTennis pic.twitter.com/miVNQYJGMJ
— wta (@WTA) February 21, 2023
अमेरिकेच्या मॅडिसन कीजसह महिला दुहेरीत सानिया मिर्झाच्या जोडीला कुदारमेटोवा आणि सॅमसोनोव्हा या जोडीने 6-4, 6-0 ने सरळ सेटमध्ये पराभूत केले. या पराभवासह सानियाची दोन दशकांची कारकीर्द संपुष्टात आली आहे.
सानिया मिर्झाचं करिअरमधलं सर्वात मोठं स्वप्न अपूर्णच, शेवटच्या मॅचनंतर संयमाचा बांध फुटला निघाले अश्रूऑस्ट्रेलिया ओपन 2023 झालेल्या स्पर्धेत सानिया अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. मात्र अंतिम सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. तिच्या करिअरमधील सर्वात मोठं स्वप्नही अपूर्ण राहिलं. मात्र दुबईच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रॅण्डस्लॅम मिळवण्याची हाती संधी होती. मात्र सामन्यात पुन्हा पराभवच नशीबी आला आणि तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
पाणावलेल्या डोळ्यांनी सानियाने टेनिस कोर्ट सोडलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सानियाने याआधी 19 फेब्रुवारीला दुबईत होणारी स्पर्धा शेवटची असल्याचं सांगितलं होतं. इंन्स्टाग्राम पोस्ट करून तिने आपण निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती.