मुंबई : आजवर आपल्या उत्कृष्ट खेळामुळे जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या सानिया मिर्झा च्या संयमाचा बंध फुटला आणि तिला ग्राउंडवर अश्रू अनावर झाले. सानिया मिर्झाच्या डोळ्यातील अश्रू पाहून नेटकरीही भावुक झाले. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील शेवटचं ग्रँडस्लॅम मिळवण्याचं सानिया मिर्झाचं स्वप्न अधूरंच राहिलं. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या सानियाला शेवटचा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हे शेवटचं ग्रँडस्लॅम आपल्या नावावर व्हावं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. त्यामुळे तिच्या संयमाचा बांध फुटला आणि बोलताना ती अचानक रडू लागली. टेनिसस्टार सानिया मिर्झाचे शेवटचे ग्रँडस्लॅम फायनल जिंकण्याचे स्वप्न अधूरं राहिलं. सानिया (३६) आणि रोहन बोपण्णा (४२) यांना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस जोडीने पराभूत केलं.
घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच सानिया मिर्झाने घेतला वेगळाच निर्णयअंतिम सामन्यानंतर जेव्हा सानियाला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. ती म्हणाली “हे आनंदाश्रू आहेत. १८ वर्षांपूर्वी मेलबर्नमधून सुरू झालेली कारकीर्द संपवण्यासाठी मेलबर्नपेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. मला इथे दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे असं ती बोलताना म्हणाली. तिचा कंठ एवढा दाटला होता की शब्दही अडखळत होते.
सानिया मिर्झाने आपल्या इंन्स्टाग्रामवरून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसाप 19 फेब्रुवारीपासून दुबईत होणारी डब्ल्यूटीए १० स्पर्धा ही तिची शेवटची स्पर्धा असेल. त्यानंतर सानिया टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे.