मुंबई, 15 फेब्रुवारी : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया येथे तिच्या कारकिर्दीतील अखरेदीची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सानियाचा पराभव झाला आणि ग्रँडस्लॅमवर पुन्हा एकदा नाव कोरण्याचे तिचे स्वप्न भंगले. अशातच आता टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सानिया मिर्झा आता क्रिकेटकडे वळली आहे. महिला प्रीमियर लीगपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने सानियावर मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली.
सोमवारी 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पारपडली. यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने स्मृती मानधना समवेत अनेक खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून संघाची बाजू भक्कम केली. तर आता आरसीबीने टेनिस स्टार सानिया मिर्झाला देखील आपल्या गोटात सामील केले असून तिच्यावर संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवली आहे. महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
While our coaching staff handle the cricket side of things, we couldn’t think of anyone better to guide our women cricketers about excelling under pressure.
Join us in welcoming the mentor of our women's team, a champion athlete and a trailblazer! Namaskara, Sania Mirza! pic.twitter.com/r1qlsMQGTb — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 15, 2023
One of the most successful female athletes in the country and a perfect role-model for our women cricketers ahead of the inaugural #WPL. We’re proud to have you around @MirzaSania.#PlayBold #WeAreChallengers #ItsHerGameToo #SheIsBold pic.twitter.com/sEg2JM8975
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 15, 2023
महिला प्रीमिअर लीगसाठी आरसीबीच्या संघात स्मृती मानधना, एलिस पॅरी, सोफी डिव्हाईन आणि मेगन शुट सारख्या अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा लिलावात समावेश आहे. स्मृती मानधना हिला आरसीबी संघाने 3.40 कोटी बोली लावून विकत घेतले. यामुळे स्मृती मानधना ही महिला प्रेमियर लीगमधली सर्वात महागडी खेळाडू ठरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, RCB, Sania mirza, Women premier league 2023