मुंबई, 04 मार्च : न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला सगळ्यात मोठा धक्का बसला. या दोऱ्यात एकदिवसीय मालिकेनंतर कसोटीतही टीम इंडियाला क्लिन स्वीप मिळाला. न्यूझीलंड दौऱ्यानंतर मात्र विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी विराटच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत, टीका केली. संदीप यांनी विराटवर यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाचे करिअर खराब केल्याचा आरोप केला आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनेने न्यूझीलंड दौऱ्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला संघात जागा न देता ऋषभ पंतला संधी दिली. मात्र पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं साहाला संधी देण्यावरून टीका करण्यात आली आहे. याबाबत संदीप पाटील यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत विराटच्या निर्णयावर राग व्यक्त केला.
वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती‘साहाच्या करिअरसोबत खेळतोय विराट’
संदीप पाटील यांनी या मुलाखतीत, "तुम्ही ऋषभ पंतला संधी देताना रिद्धिमान साहाच्या करिअरसोबत खेळत आहात. परदेशात आपल्याला अनुभवी विकेटकीपरची आवश्यकता आहे आणि त्यामुळे साहा ही पहिली पसंती असायला हवी होती. साहाने नेहमीच संघासाठी चांगले काम केले आहे, तर त्याच्यावर विश्वास का ठेवला जात नाही?”, असा सवाल उपस्थित केला. याआधी साहाने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्ध एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही.
वाचा-IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांचे होणार नुकसान‘विराटने संघ बांधणीवर भर द्यावा’
जेव्हा भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा टीम व्यवस्थापन रिद्धिमान साहाला खेळण्याची संधी देते. त्यामागील कारण सांगण्यात आले की साहा हा भारतीय संघाचा सर्वोत्तम विकेटकीपर फलंदाज आहे. पण जेव्हा जेव्हा हा संघ परदेशात खेळतो तेव्हा ऋषभ पंतला संधी दिली आहे. यावरही संदीप पाटील यांनी राग व्यक्त केला. भारतीय संघाची पुढची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यात विराट कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे.
वाचा-16 व्या वर्षी फक्त 18 सामने खेळून झाली नंबर वन, दिग्गजही पडले मागे
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.