मुंबई, 28 एप्रिल : तेलुगू आणि तामिळ सिनेमातील आघाडीची नायिका असलेली संमाथा रूथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) आज वाढदिवस आहे. समांथानं प्रामुख्यानं दक्षिणात्य सिनेमे केले असले तरी तिचे फॅन्स संपूर्ण देशभर आहेत. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमानं हिंदीमध्येही लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. पुष्पामध्ये समांथाचं एक आयटम साँग प्रचंड गाजलं. सध्या कोणत्याही पार्टीमध्ये ते आयटम साँग हमखास वाजवले जाते. आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) लग्नाला 27 एप्रिल रोजी एक महिना झाला. त्यामुळे आरसीबीच्या खेळाडूंसाठीही खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये पुष्पामधील समांथाच्या ‘ऊ अंटावा’ गाण्याची जादू दिसली. आरसीबीचे सर्व खेळाडू आणि स्टाफ या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीसाठी त्यांनी खास भारतीय पोषाख घातला होता. आरसीबाीचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या पार्टीत चांगलीच धमाल केली. काळा कुर्ता घालून आलेल्या विराटनं पुष्पामधील ‘ऊ अंटावा’ गाण्यावर जोरदार डान्स केला. विराटच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mood 😎 @imVkohli @RCBTweets #IPL #IPL2022 #ViratKohli #CricketTwitter #RCB #PlayBold pic.twitter.com/pWwYYSFFq0
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) April 27, 2022
आरसीबीच्या वेगवेगळ्या खेळाडूंनी त्यांच्या सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
फाफ ड्यू प्लेसिसच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या आरसीबीनं या स्पर्धेची सुरूवात जोरदार केली होती. त्यांनी पहिल्या सातपैकी पाच मॅच जिंकल्या होत्या. त्यानंतर मागील दोन मॅचमध्ये आरसीबीला पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध आरसीबीची टीम 68 रनवर ऑल आऊट झाली होती. हा या सिझनमधील कोणत्याही टीमचा निचांक आहे. तर त्यानंतर राजस्थान रॉयल्सनंही त्याचा पराभव केला. IPL 2022, KKR vs DC Dream 11 Team Prediction: ‘या’ खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य विराट कोहलीचा फॉर्म देखील आरसीबीसाठी काळजीची बाब आहे. मागील तीन मॅचमध्ये विराटनं 0,0 आणि 9 रन केले आहेत. आरसीबीचाी पुढील मॅच शनिनारी गुजरात टायटन्स विरूद्ध होणार आहे.