मुंबई, 17 मे : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि सलमान बट यांच्यात विराट कोहलीवरून सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. मायकल वॉनने केलेल्या मॅच फिक्सर या वक्तव्यावरून सलमान बटने पलटवार केला आहे. वॉनने केलेलं मॅच फिक्सर हे वक्तव्य दर्जाहिन असल्याचं सलमान बट म्हणाला आहे. सलमान बटने त्याच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मायकल वॉनवर टीका केली आहे. त्याने चुकीच्या संदर्भातला विषय निवडला आणि दर्जाहिन गोष्टी केल्या. काही लोकांची मानसिक अवस्था ठीक नसते, त्यांचं काहीही केलं जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया बटने दिली. सलमान बटने त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या एका व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि केन विलियमसनवर वॉनने केलेल्या टिप्पणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यानंतर वॉन-बट यांच्यात वाद सुरू झाला. बट त्याच्या व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला, ‘वॉनने ज्या पद्धतीने माझ्याविषयी वक्तव्यं केली, ती मुद्द्याला धरून नव्हती. जर त्याला भूतकाळातच जगायचं असेल, तर त्यांनी जगावं. बद्धकोष्ट एक आजार आहे, काही लोकांना मानसिक बद्धकोष्टही होतं. त्यांचं डोकं भूतकाळातच असतं, त्यामुळे मला काही फरक पडत नाही.’ IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO ‘आपण विराट आणि विलियमसन या दोन महान खेळाडूंबाबत बोलत होतो, पण वॉन याला दुसऱ्या दिशेने घेऊन गेला. वॉन काहीही बोलला तरी सत्य बदलणार नाही. कोहलीची कोणासोबतही तुलना होऊ शकत नाही. मी कोणत्याही देशाला फेवर केलं नाही. वॉनच्या उत्तरामुळे मी हताश आहे. त्याच्या बोलण्यात काहीही दम नाही. चिखलात दगड मारला तर तो चिखल आपल्याच अंगावर पडतो,’ असं वक्तव्य बटने केलं.
केन विलियमसन भारतीय असता, तर तो जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू असता. विलियमसन कोहलीची बरोबरी करू शकत नाही, कारण त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स नाहीत, असं काहीच दिवसांपूर्वी मायकल वॉन म्हणाला होता. वॉनच्या याच वक्तव्यावर सलमान बटने टीका केली होती. वॉनने आकड्यांचा आधार घेऊन तथ्य मांडावं, असा सल्ला बटने दिला होता. बटचा हा सल्ला वॉनला आवडला नाही, तसंच बट मॅच फिक्सर असल्याचं वॉन म्हणाला.
No idea what the headline is ... but I seen what Salman has said about me ... that’s fine and he is allowed his opinion but I wished he had such a clear thought of mind back in 2010 when he was Match fixing !!! https://t.co/EkDWuH7Vi4
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 16, 2021
भारतीय क्रिकेटपेक्षा शेती बरी, माजी कोचचा दावा! खेळाडू आणि प्रशासनावर केला आरोप 2010 साली बट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसीफ यांच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने बंदी घातली. हे तिन्ही खेळाडू लॉर्ड्स टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळले होते. तसंच तिघांनाही काळ जेलमध्येही जावं लागलं होतं.