Home /News /sport /

भारतीय क्रिकेटपेक्षा शेती बरी! माजी कोचचा दावा, खेळाडू आणि प्रशासनावर केला आरोप

भारतीय क्रिकेटपेक्षा शेती बरी! माजी कोचचा दावा, खेळाडू आणि प्रशासनावर केला आरोप

भारतीय महिला क्रिकेट टीमचे (Team India Women) मुख्य कोच म्हणून रमेश पोवारची (Ramesh Powar) मागच्या आठवड्यात नियुक्ती झाली आहे. या निवडीनंतर सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही.

    मुंबई, 17 मे: भारतीय महिला क्रिकेट टीमचे (Team India Women) मुख्य कोच म्हणून रमेश पोवारची (Ramesh Powar) मागच्या आठवड्यात नियुक्ती झाली आहे. या निवडीनंतर सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. मावळते कोच WV रमन यांनी या विषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना ई मेल लिहून त्यांची बाजू मांडली आहे. त्यापाठोपाठ आणखी एक माजी कोच पौर्णिमा राव (Purnima Rao) यांनी महिला क्रिकेटमध्ये कोचला कोणतीही प्रतिष्ठा नाही असा आरोप केला आहे. पौर्णिमा राव यांनी News18.com सोबत बोलताना  हा आरोप केला. पौर्णिमा राव या टीमच्या शेवटच्या महिला कोच आहेत. त्यांच्यानंतर तुषार आरोठे, रमेश पोवार, WV रमन आणि पुन्हा एकदा रमेश पोवार यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. महिला टीममध्ये कोचला काही प्रतिष्ठा नाही, या प्रकाराला खेळाडू, प्रशासन आणि सपोर्ट स्टाफ जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ''आपल्याला 2015-16 साली पदावरुन का काढण्यात आलं याचं कोणतंही कारण सांगण्यात आलं नाही. त्यावर्षी ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत पराभूत केल्यानंतर खेळाडूंमध्ये विजयाची भूक निर्माण झाली होती. टीमनं वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पैसा, करार आणि सर्व काही मिळालं. खेळाडू यामधून सावरु शकले नाहीत. त्यांच्यामधील बॉन्डिंग कमी झाली," असा दावा राव यांनी केला. Ball Tampering Scandal: ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टनचं मोठं वक्तव्य, म्हणाला... क्रिकेटपेक्षा शेती बरी! पौर्णिमा राव यांनी 1993 ते 2000 या कालावधीमध्ये 5 टेस्ट आणि 33 वन-डे मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. त्या सध्या हैदराबादपासून 40 किलो मीटर दूर सेंद्रीय शेती (organic farming) करतात. 'मी सेंद्रीय भाजी आणि फळांची शेती करते. यामध्ये मिळालेलं उत्पन्न परिवार आणि मित्रमंडळींमध्ये वाटते. मी या क्षणाचा आनंद घेत आहे. भारतीय महिला क्रिकेटमधून मला जे काही मिळालं त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे." अशी भावना राव यांनी यावेळी बोलून दाखवली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket, Team india

    पुढील बातम्या