Home /News /viral /

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO

सीएसकेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धोनी (MS Dhoni) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हे दोघं दिसत आहेत. यावेळी धोनी हातानंच रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) तलवारबाजीची नक्कल करतो.

    मुंबई, 17 मे : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. सध्या सर्व आयपीएल फ्रँचायझी या स्पर्धेदरम्यानचे काही व्हिडीओ शेअर करत आहेत. राजस्थान रॉयल्सनं (RR) काही दिवसांपूर्वी राहुल तेवातिया (Rahul Tewatia) प्रोपज करत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral) झाला. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) देखील नुकताच महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सीएसकेनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धोनी आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हे दोघं दिसत आहेत. यावेळी धोनी हातानंच रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) तलवारबाजीची नक्कल करतो. धोनीनं त्याच्या खास शैलीत जडेजाची नक्कल केली. ही नक्कल पाहून उथप्पाला हसू आवरले नाही. रविंद्र जडेजा अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटनं तलवारबाजीचं प्रात्याक्षिक करत आनंद व्यक्त करतो. त्याची ही स्टाईल क्रिकेट विश्वात चांगलीच लोकप्रिय आहे. चेन्नई सुपर किंग्सनं या आयपीएलमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले असून त्यांचा स्पर्धा स्थगित झाली तेंव्हा पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक होता. मागच्या वर्षीाच्या निराशाजनक कामगिरीनंतर सीएसकेनं आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात जोरदार कमबॅक केलं. धोनीच्या टिप्समुळे मिळाली टीम इंडियात जागा, आता इंग्लंड दौऱ्यात करणार कमाल! सीएसकेच्या या कामगिरीत रविंद्र जडेजाच्या ऑल राऊंड कामगिरीचा मोठा वाटा आहे. जडेजासह मोईन अली, ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी देखील आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात चांगली कामगिरी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Ravindra jadeja, Video viral

    पुढील बातम्या