नवी दिल्ली, 27 मे: भारतीय क्रिकेट टीममधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू जसप्रीत बुमराहबद्दल (Jasprit Bumrah) कौतुक करताना माजी खेळाडू थकत नाहीत. असंच कौतुक आता पाकिस्तानच्या माजी कॅप्टननं केलं आहे. ‘भारतीय क्रिकेट टीममधला पेस बॉलर जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगचा क्लासच वेगळा आहे. नव्वदच्या दशकात आमच्या पाकिस्तानी टीममध्ये वासीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनूस (Waqar Younis) हे दोन भेदक वेगवान गोलंदाज असणं ही जशी जमेची बाजू होती तसंच आता भारतीय टीममध्ये जसप्रीत बुमराहचं स्थान आहे. ती भारताची जमेची बाजू आहे,’ अशा शब्दांत पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सलमान बट्ट (Salman Butt) याने पेस बॉलर बुमराहचं कौतुक केलं आहे. बट्टने त्याच्या युट्युब चॅनच्या माध्यमातून हे मत व्यक्त केलं आहे.
जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगचं जगातल्या महान बॉलर्सनी या आधीही कौतुक केलं आहे. 2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर सर्वात कमी वेळात देशासाठी 50 विकेट्स घेण्याची कामगिरी बुमराहने करून दाखवली आहे त्याचबरोबर त्याने एक हॅटट्रिकही आपल्या नावे केली आहे. त्यामुळे या खेळाडूने त्याचा फिटनेस राखला तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्सही घेऊ शकेल असं वेस्ट इंडिजचा महान बॉलर कर्टनी अँब्रोजनेही व्यक्त केलं होतं. 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम करणारे रिचर्ड हॅडली यांनीही बुमराहचं कौतुक करून त्याच्या बॉलिंगचा भारताने चांगला उपयोग करून घ्यावा असा सल्ला दिला होता.
हे वाचा-'महेंद्रसिंह धोनी स्वत: CSK पासून दूर होणार', 'या' क्रिकेटपटूचा दावा
दरम्यान सलमान बट्टनेही त्यांचं कौतुक केलं आहे. आपल्या व्हिडीओत बट्ट म्हणाला, ‘अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर बुमराह म्हणजे टोयोटा किंवा कोरोला कार नाही तर त्याचं कॅलिबर फेरारी आणि लँबॉर्गिनीसारख्या महागड्या गाड्यांइतकं मौल्यवान आहे. अशा बॉलरचा वापर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केला तर तो टीमसाठी दीर्घकाळ खेळू शकतो. महत्त्वाच्या सामन्यात योग्य वेळी त्याच्या बॉलिंगचा वापर केला तर त्याच्याकडूनही तशाच प्रतीचा खेळ आपल्याला मिळू शकतो. या घडीला बुमराह हा एकमेवाद्वितीय आहे आणि तो सध्याचा जगातील सर्वोत्तम बॉलरही आहे.’
हे वाचा-IPL साठी T20 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना
बुमराहच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य म्हणजे तो शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल टाकतो आणि खूपच कमी रन देतो. याबद्दल बट्ट म्हणाला, ‘ कॅप्टनला जेव्हा चांगल्या कामगिरीची किंवा रन रोखण्याची गरज असते तेव्हा त्याने विश्वासाने ज्याच्या हातात बॉलिंगसाठी बॉल द्यावा अशा बॉलरपैकी बुमराह एक आहे. रोहित शर्मा बुमराहला सुरुवातीची एक ओव्हर देतो आणि नंतर शेवटच्या स्लॉटसाठी त्याच्या ओव्हर वाचवून ठेवतो. त्याचं कारण हेच की शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्ध्यांना 30-40 रन्स हव्या असतील तर बुमराह त्या वाचवूही शकतो आणि विकेटही घेऊ शकतो. वासीम अक्रम आणि वकार युनूस हे दोघंही साधारण 30-40 रन्स वाचवायचे त्यामुळे भारतीय टीममधलं बुमराहचं स्थान हे या दोघांच्या पाकिस्तानच्या टीममधल्या वासीम-वकारच्या स्थानाइतकंच महत्त्वाचं आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jasprit bumrah