मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL साठी 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना

IPL साठी 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये करण्याची बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. या स्पर्धेमुळे टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021) युएईसह आणखी एका देशात घेण्याची आयसीसीची योजना आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 27 मे: आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये करण्याची बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. त्याचबरोबर युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आणि काही द्विपक्षीय मालिका देखील होणार आहेत. युएईमधील तीन पिचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पिच स्लो होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आयसीसी (ICC) नवी योजना तयार करत आहे.

'क्रिकइन्फो'ने दिलेल्या बातमीनुसार टी 20 वर्ल्ड कपचे काही सामने युएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची योजना आहे. आयपीएलचे 31 आणि टी 20 वर्ल्ड कपचे पात्रता फेरीसह 45 सामने युएईमील तीन पिचवर खेळवणे सोपे जाणार नाही. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) 60 सामने युएईत झाले होते. यंदा ही संख्या 16 ने जास्त आहे.

क्वारंटाईनसाठी परवानगी आवश्यक

या विषयावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार टी 20 वर्ल्ड कप युएईमध्ये झाला तर स्पर्धेतील सुरुवातीचे सामने ओमानमध्ये होण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठी युएई सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू क्वारंटाईन न राहता दोन्ही देशांमध्ये प्रवास करु शकतील. युएई सरकारने प्रत्येक देशांसाठी क्वारंटाईनचे वेगवेगळे नियम बनवले आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या महिन्यापासून टीम युएईमध्ये येण्यास सुरुवात होईल.

'त्याला खाली पाड' सहकाऱ्याला सूचना देताना बांगलादेशच्या खेळाडूचा VIDEO VIRAL

वेस्ट इंडिजचे खेळाडू उशीरा सहभागी होणार

आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (CPL) या सिझनची फायनल 19 सप्टेंबर रोजी आहे.त्यामुळे मुंबईचा कायरन पोलार्ड, केकेआरचा आंद्रे  रसेल, सुनिल नरीन, पंजाबचा निकोलस पूरन, ख्रिस गेल यांच्यासह अनेक बडे खेळाडू सुरुवातीच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.  वेस्ट इंडिजमधून येणाऱ्या या खेळाडूंना युएईमध्ये क्वारंटईन देखील राहावे लागणार आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Icc, Ipl