• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Sagar Dhankar Murder : दिल्ली पोलिसांना धक्का, सुशील कुमारबाबत कोर्टानं फेटाळली मागणी

Sagar Dhankar Murder : दिल्ली पोलिसांना धक्का, सुशील कुमारबाबत कोर्टानं फेटाळली मागणी

दिल्लीतील छत्रलाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) 4 मे रोजी सागर धनखड (Sagar Dhankar) या 23 वर्षांच्या कुस्तीपटूची झालेल्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना (Delhi Police) धक्का बसला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 3 मे: दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) 4 मे रोजी सागर धनखड (Sagar Dhankar) या 23 वर्षांच्या कुस्तीपटूची झालेल्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना (Delhi Police) धक्का बसला आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. सुशीलच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. कोर्टानं ती मागणी फेटाळत त्याची 14 दिवसांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये (judicial custody) रवानगी केली आहे. दिल्ली पोलिसांना धक्का दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाच्या दरम्यान एक महत्त्वाचा व्हिडीओ (Video) हाती लागल्याचा दावा केला आहे. आरोपी सुशीलला हरिद्धवारला नेऊन या प्रकरणातील आणखी काही लोकांना अटक करायचं असल्याचा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला. त्याचबरोबर सुशील तपासात कोणतीही मदत करत नसल्याची तक्रार पोलिसांनी कोर्टात केली. हेही वाचा- गजब ! मुंबईत पोलिसानंच लुटलं ज्वेलर्स मालकाला, तब्बल 1.25 कोटींचा गंडा या प्रकरणात तब्बल दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला 23 मे रोजी अटक करण्यात आली  होती. सुशील पोलीस कोठडीमध्ये असताना त्याच्या चौकशीत कोणताही ठोस पुरावा दिल्ली पोलिसांना मिळालेला नाही. या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचनी या हत्येचा कोणताही ठोस निष्कर्ष अद्याप काढलेला नाही. सागर धनकरच्या हत्येला एक महिना झाल्यानंतरही  या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. सागरला मारहाण करताना सुशील कुमारनं घातलेले कपडे किंवा ती काठी अजूनही हस्तगत झालेली नाही. त्याचबरोबर ज्या कारमधून सुशील कुमारने फरार असताना प्रवास केला ती कार जप्त करण्यात देखील दिल्ली पोलिसांना अपयश आले आहे. भारताकडे सबळ पुरावे, मेहुल चोक्सीला भारतात पाठवावे: डोमिनिका सरकार सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मे रोजी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीच्या वेळी सुशील कुमार देखील उपस्थित होता, असे या घटनेच्या CCTV फुटेजवरुन उघड झाले आहे.
    Published by:News18 Desk
    First published: