मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भारताकडे सबळ पुरावे, मेहुल चोक्सीला भारतात पाठवावे: डोमिनिका सरकार

भारताकडे सबळ पुरावे, मेहुल चोक्सीला भारतात पाठवावे: डोमिनिका सरकार

पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी फरार मेहुल चोक्सी  (Mehul Choksi)च्या भारत प्रत्यार्पणावरील सुनावणी बुधवारी पार पडली. मात्र डोमिनिका उच्च न्यायालयानं (Dominica HC Court) आपला निर्णय राखून ठेवला आहे.

नवी दिल्ली, 03 जून:  पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी फरार मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) च्या भारत प्रत्यार्पणावरील सुनावणी बुधवारी पार पडली. मात्र डोमिनिका उच्च न्यायालयानं (Dominica HC Court) आपला निर्णय राखून ठेवला आहे. चोक्सीला भारतात पाठवले जाईल की अँटिग्वा येथे जावे लागेल यावर न्यायालय आज निर्णय देईल. दरम्यान तुरुंगात असुरक्षित वाटत असल्यानं चोक्सीनं न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितलं की, मेहुल चोक्सी प्रकरणाची सुनावणी डोमिनिका न्यायालयात पूर्ण झाली आहे. मेहुल चोक्सीलाआज दुपारी 4 वाजता (डोमिनिका वेळेनुसार) न्यायालयसमोर हजर केले जाईल. जर डोमिनिका पोलिसांनी एखाद्यास अटक केली तर त्यांना 72 तासांच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर (मजिस्ट्रेट) हजर करावं लागतं, जे झाले नाही. त्यामुळे त्यामुळे दुपारी चार वाजता त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या आधारावर आज न्यायालयात पुन्हा चर्चा होईल.

हेही वाचा- Wedding Anniversary:अमिताभ-जया बच्चन यांच्या लग्नातला 'हा' खास फोटो पाहिलात?

डोमिनिका सरकारने सुनावणीदरम्यान म्हटलं की, मेहुलची याचिका वैध नाही आहे. तो बेकायदेशीरपणे देशात दाखल झाला आहे. भारताची बाजू मजबूत असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यात यावं. 25 मे रोजी डोमिनिका मार्गे क्युबाला जात असताना त्याला अटक करण्यात आली.

या सुनावणी दरम्यान सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची टीमही न्यायालयात हजर होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या सुनावणीत मेहुल चोक्सी रुग्णालयात होता.

First published:

Tags: Pnb bank