मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Sagar Dhankhar Murder: सुशील कुमारचे महिला खेळाडूशी कनेक्शन, चौकशीत होणार मोठा खुलासा!

Sagar Dhankhar Murder: सुशील कुमारचे महिला खेळाडूशी कनेक्शन, चौकशीत होणार मोठा खुलासा!

ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhar Murder case) अटकेत आहे. या प्रकरणात एका महिला खेळाडूचे कनेक्शन उघड झाले आहे.

नवी दिल्ली, 26 मे: ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhar Murder case) अटकेत आहे. सुशीलच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. सुशीलच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.या संपूर्ण तपासामधून  सुशील कुमारला मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये एका महिला खेळाडूचे नाव समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एक स्कुटी जप्त केली आहे. ही स्कुटी पश्चिम दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिला खेळाडूची असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे.  सुशील कुमार आणि अजय कुमार हे शनिवारी रात्री या महिला खेळाडूच्या घरी थांबले होते. त्यानंतर ते स्कुटीने दुसरीकडे पैसे मागण्यासाठी जाणार होते.

ही महिला  हँडबॉल  खेळाडू असून तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या महिलेची चौकशी होणार असून या चौकशीत नवे खुलासे होतील असा पोलिसांना विश्वास आहे.

सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मे रोजी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण झाली, असा दावा दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या घटनेच्या फुटेजवरूनही हे स्पष्ट झाले आहे. सुशील कुमारही या मारहाणीच्या दरम्यान उपस्थित होता, असे फुटेजमध्ये दिसत होते.

काँग्रेस आमदाराला महिलेनं अश्लील VIDEO कॉल करून दिला त्रास; ब्लॅकमेलनंतर प्रकरण उजेडात

सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते असंही समोर येत आहे. या मारहाणीनंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता.  त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारनं या प्रकरणी कोर्टात धावही घेतली. पण त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi, Delhi Police, Murder, Wrestler