छतरपूर, 26 मे: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या (INC) एका आमदाराला (MLA) अज्ञात महिलेनं अश्लील व्हिडीओ कॉल (Obscene video Call) करून ब्लॅकमेल (Blackmail) केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर संबंधित आमदारानं पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. संबंधित अज्ञात आरोपी महिला मागील काही दिवसांपासून पीडित आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉल करून त्रास देत होती. या प्रकरणी गढीमलहरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित काँग्रेस आमदाराचं नाव नीरज दिक्षित असून ते मध्य प्रदेशातील महाराजपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, मागील काही दिवसांपासून त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज येते होते. मतदार संघातील एखाद्या गरजू व्यक्तीचा मेसेज असल्याचं समजून त्यांनी याला रिप्लाय दिला. पण यानंतर संबंधित मोबाइल नंबरवरून व्हिडीओ कॉल येणं सुरू झालं. एकेदिवशी संबंधित महिलेनं व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित अज्ञात महिलेनं ब्लॅकमेल करायलाही सुरुवात केली, असं आमदार दिक्षित यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांचा तपास सुरू
विद्यमान आमदार नीरज दिक्षित यांनी गढीमलहरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध घेतला जात आहे. संबंधित महिला नेमकी कोण आहे? आणि ती आमदाराला का त्रास देत आहे? या बाबी पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा-Aurangabad : बायकोची मैत्रीण बनली प्रेयसी, अडथळा दूर करण्यासाठी काढला पतीचा काटा
सायबर क्राइमची नवीन पद्धत
याप्रकरणी डीएसपी शशांक जैन यांनी सांगितलं की, ही सायबर गुन्ह्यांची एक नवीन पद्धत आहे. बर्याच वेळा अश्लील कृत्ये करताना महिला संबंधित कॉल रेकॉर्ड करतात आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं. याच वस्तुस्थितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. ब्लॅकमेल करणार्या महिलेचा लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Crime news, Mla