जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Saff Championship 2023 : सुनील छेत्रीची हॅटट्रिक, टीम इंडियाने पाकिस्तानला 4-0ने लोळवलं

Saff Championship 2023 : सुनील छेत्रीची हॅटट्रिक, टीम इंडियाने पाकिस्तानला 4-0ने लोळवलं

भारताने पाकिस्तानला 4-0ने हरवले

भारताने पाकिस्तानला 4-0ने हरवले

दिल्ली, 22 जून : सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने ४-० अशा गोल फरकाने विजय मिळवला. सुनील छेत्रीचे तीन आणि उदांता सिंहने एक गोल केला. भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त सुरू आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली इंटरकाँटिनेंटर कप जिंकल्यानंतर सैफ चॅम्पियनशिपमध्येही चांगली सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना 4-0 ने धूळ चारली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 22 जून : सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने ४-० अशा गोल फरकाने विजय मिळवला. सुनील छेत्रीचे तीन आणि उदांता सिंहने एक गोल केला. भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त सुरू आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली इंटरकाँटिनेंटर कप जिंकल्यानंतर सैफ चॅम्पियनशिपमध्येही चांगली सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना 4-0 ने धूळ चारली. इंग्लंडला Bazball पडले महागात, ऑस्ट्रेलियाने तोंडचा घास घेतला हिरावून   भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने हॅटट्रिक नोंदवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक नोंदवत सुनिल छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा दुसरा आशियाई खेळाडू बनला आहे. ईराणच्या इल देई याने 149 सामन्यात 109 गोल केले आहेत. तर छेत्रीचे आता 90 गोल झाले आहेत. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला. पण पाकिस्तानी संघ भारतासमोर फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. छेत्रीने रविवारी भुवनेश्वरमध्ये लेबनान विरुद्ध इंटर कॉटिंनेंटल कपमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता घरच्या मैदानावरही चमक दाखवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: football
  • First Published :
जाहिरात
जाहिरात