जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शुभमनवर सचिनने केला कौतुकाचा वर्षाव, लिहिली भलीमोठी पोस्ट; CSKला दिला सल्ला

शुभमनवर सचिनने केला कौतुकाचा वर्षाव, लिहिली भलीमोठी पोस्ट; CSKला दिला सल्ला

शुभमनसाठी सचिनची पोस्ट

शुभमनसाठी सचिनची पोस्ट

आयपीएल फायनलआधी सचिनने सोशल मीडियावर शुभमन गिलचं तोंडभरून कौतुक केलं आहे तर चेन्नईला एक सल्लाही दिला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : क्वालिफायर दोन सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवून पुन्हा एकदा गुजरात टायटन्सने फायनलमध्ये धडक मारली. सामन्यात शुभमन गिलच्या वादळी शतकात मुंबईच्या बॉलर्सची अक्षरश: वाताहत झाली. शुभमनने अवघ्या 60 चेंडूत 129 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीचं कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर केलं आहे. सचिनने शुभमनवर कौतुकाचा वर्षावच केला आहे. तसंच आजच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला एक मोलाचा सल्लाही दिला आहे. शुभमनची खेळी अविस्मरणीय असल्याचं सांगताना त्याची धावांची भूक आणि चपळाई पाहून मी प्रभावित झालो असं सचिनने म्हटलं. सचिनने इन्स्टाग्रामवर शुभमन गिलचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, शुभमनने यंदाच्या हंगामात केलेली फलंदाजी ही अविस्मरणीय आहे. शुभमनच्या दोन शतकांचा परिणाम हा कधीच न पुसता येणारा आहे. एका शतकाने मुंबईच्या आशा जिवंत केल्या तर एका शतकाने मुंबईला चिरडून टाकलं. अंदाज लावता न येणारं क्रिकेट आहे. IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच शुभमनची धावांची भूक, त्याचा स्वभाव, शांतपणा आणि पळून धावा काढण्यासाठीचा चपळपणा, चातुर्य या गोष्टींनी मी प्रभावित झालो अशा शब्दात सचिनने शुभमन गिलचं कौतुक केलं आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात शुभमने 12 व्या षटकानंतर केलेली फटकेबाजी गुजरातला बरीच पुढे घेऊन गेली. सामन्यात त्याचा वेग आणि खेळावर प्रभाव टाकण्याची क्षमता दिसून आली असंही सचिनने म्हटलं. मुंबई इंडियन्सनेही सामन्यात पुनरागमन केलं. तिलक वर्माने मोहम्मद शमीला 24 धावा काढून आशा जिवंत केल्या. त्या सूर्यकुमार यादव बाद होईपर्यंत होत्या असं सचिन इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला.

जाहिरात

चेन्नईला आजच्या सामन्यात जिंकायचं असेल तर शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्स या विजयाची चावी असणार आहेत असा सल्ला सचिनने चेन्नई सुपर किंग्जला दिला आहे. अंतिम सामना रंगतदार होणार असल्याचंही सचिन म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात