Home /News /sport /

IPL 2022: RCB प्लास्टिकच्या बाटल्यांची जर्सी घालून मैदानात उतरणार! 2011 पासूनची परंपरा; हे आहे कारण

IPL 2022: RCB प्लास्टिकच्या बाटल्यांची जर्सी घालून मैदानात उतरणार! 2011 पासूनची परंपरा; हे आहे कारण

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात हिरव्या जर्सीत दिसणार आहे. आरसीबी संघ दरवर्षी आयपीएलदरम्यानच्या सामन्यात हिरवी जर्सी घालतो. आरसीबीने 2011 पासून ही परंपरा सुरू केली. वास्तविक, आरसीबीची टीम या खास जर्सीच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करते.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 7 मे : इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या (IPL 2022) मोसमात 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers bangalore) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात आरसीबीचा संघ हिरव्या जर्सीत दिसणार आहे. आरसीबीचे चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना आकर्षक हिरव्या जर्सीत (Green Jersey) पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ही जर्सी संघासाठी फारशी लकी ठरली नसली तरी हंगामात एकदा आरसीबी संघ सामन्यात हिरवी जर्सी घालतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सामन्यात हिरवी जर्सी का घालतो? आज आम्ही तुम्हाला त्याचबद्दल सांगणार आहोत. आरसीबी संघात हिरवी जर्सी घालण्याचा ट्रेंड 2011 मध्ये सुरू झाला. यानंतर दरवर्षी आयपीएल सामन्यात संघ हिरवी जर्सी घालतो. हा ड्रेस परिधान करण्यामागे संघाचा विशेष उद्देश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. या जर्सीच्या माध्यमातून आरसीबी टीम लोकांना संदेश देते की, आजूबाजूच्या वृक्षांची आणि झाडांची काळजी घ्या. त्यांच्या वाढीचा विचार करा. त्यांना कत्तल करू नका. एकूणच आरसीबी टीम पर्यावरण वाचवण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी ग्रो ग्रीन मोहिमेला प्रोत्साहन देत आहे. ग्रीन जर्सी कशी बनवली जाते? आरसीबी संघ वर्षातून एकदा IPL दरम्यान जी हिरवी जर्सी घालते ती रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवली जाते. गेल्या वर्षी आरसीबीच्या सामन्यादरम्यान गोळा केलेल्या प्लास्टिक किंवा बॉटल्समधून ते तयार केले जाते. आकडेवारीबद्दल सांगायचे तर, सुमारे 11000 हजार बाटल्या गोळा करून इको-फ्रेंडली कापड तयार केले जाते, त्यानंतर हा हिरवा ड्रेस तयार केला जातो. आरसीबीने गेल्या वर्षी निळी जर्सी परिधान केली गेल्या वर्षी 2021 मध्ये, जेव्हा UAE मध्ये IPL चा दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा RCB ने KKR विरुद्धच्या सामन्यात निळ्या रंगाची जर्सी घातली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंनी कोविड-19 दरम्यान आघाडीवर असलेल्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ ही निळी जर्सी घातली होती. हा ड्रेस पीपीई किटशी जुळता होता. या टीमने सांगितले होते की जे लोक पुढे येत आहेत आणि कोरोना महामारीमध्ये लढत आहेत त्यांना समर्पित आहे. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर निळी जर्सी आरसीबीसाठी भाग्यवान ठरली नाही. केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

  IPL 2022, PBKS vs RR : राजस्थानसमोर धोकादायक पंजाबचं आव्हान, मयंकनं टॉस जिंकला

  आरसीबीचा ग्रीन जर्सीमध्ये प्रवास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएल सामन्यादरम्यान हिरवी जर्सी घातली, तेव्हा ती त्यांच्यासाठी फारशी भाग्यवान ठरली नाही. हिरव्या जर्सीमध्ये, बंगळुरू संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत ज्यात 2 जिंकले आहेत आणि सात पराभूत झाले आहेत. यादरम्यान एका सामन्याचा निकाल लागला नाही. संघाची निळ्या जर्सीची आकडेवारी पाहिली तर 2011 मध्ये विजय, 2012 पराभव, 2013 पराभव, 2014 पराभव, 2015 कोणताही निकाल नाही, 2016 विजय, 2017 पराभव, 2018 पराभव, 2019 पराभव, 2020 पराभव आणि 2021 मध्ये ब्लू जर्सीमध्येही संघाला पराभव पाहावा लागला.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: RCB, Virat kohali

  पुढील बातम्या