मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Rahul Dravid: ‘जंगलात 4 हजार वाघ पण राहुल द्रविड एकच!’ पाहा रॉस टेलरच्या आत्मचरित्रातला भन्नाट किस्सा

Rahul Dravid: ‘जंगलात 4 हजार वाघ पण राहुल द्रविड एकच!’ पाहा रॉस टेलरच्या आत्मचरित्रातला भन्नाट किस्सा

रॉस टेलर आणि राहुल द्रविड

रॉस टेलर आणि राहुल द्रविड

Rahul Dravid: माजी किवी फलंदाज रॉस टेलरनं आपलं एक आत्मचरित्र नुकतच प्रकाशित केलं. ‘रॉस टेलर- ब्लॅक अँड व्हाईट’ या आपल्या आत्मचरित्रात टेलरनं क्रिकेट कारकीर्दीतील अनेक घटनांना उजाळा दिला आहे. आणि त्यातलाच एक किस्सा आहे तो ‘द वॉल’ राहुल द्रविडबाबतचा.

पुढे वाचा ...
  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 14 ऑगस्ट: न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरनं काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. निवृत्तीनंतर टेलरनं आपलं एक आत्मचरित्र नुकतच प्रकाशित केलं. ‘रॉस टेलर- ब्लॅक अँड व्हाईट’ या आपल्या आत्मचरित्रात टेलरनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील अनेक घटनांना उजाळा दिला आहे. आणि त्यातलाच एक किस्सा आहे तो टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक ‘द वॉल’ राहुल द्रविडबाबतचा. आयपीएल ही अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेनं जगभरातील क्रिकेटर्सना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. याच स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या वेगवेगळ्या देशांमधील खेळाडूंमधलं नातं पहिल्यापेक्षा अधिक घट्ट झालं आहे. 2011 साली याच आयपीएलमध्ये रॉस टेलरही खेळला होता. तिथे त्यानं राजस्थान रॉयल्समधून खेळताना राहुल द्रविडसोबत ड्रेसिंग रुम शेअर केली होती. आपल्या आत्मचरित्रात द्रविडबाबतची एक आठवण रॉसनं सांगितली आहे. नॅशनल पार्क, द्रविड आणि वाघ रॉस टेलर एकदा राहुल द्रविडसोबत राजस्थानमधलं रणथंबोर नॅशनल पार्क पाहायला गेला होता. त्यावेळी इतर पर्यटकांचीही तिथे भरपूर गर्दी होती. तिथे हे सगळे पर्यटक वाघ बघायला आले होते. पण द्रविड दिसताच  सगळ्यांचं लक्ष वाघांऐवजी द्रविडकडेच वळलं. टेलर आणि द्रविडनं त्यावेळी अवघ्या 100 मीटरवरुन वाघ पाहिला. पण इतर पर्यटकांचे कॅमेरे वाघाबरोबर द्रविडकडेही वळले होते. तेव्हा टेलरनं मिश्किलपणे टिप्पणी केली आणि आपल्या पुस्तकात म्हटलंय, “ जगभरात जवळपास 4 हजार वाघ आहेत. पण द्रविड एकच आहे. म्हणूनच वाघासोबतच द्रविडला पाहण्यासाठीही पर्यटक तितकेच उत्सुक होते.” हेही वाचा - Harmanpreet Kaur: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटताच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर का झाली भावूक? टेलरचं आत्मचरित्र आणि वाद ‘रॉस टेलर- ब्लॅक अँड व्हाईट’ मध्ये टेलरनं काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये त्याला वंशवादाचा सामनाही करावा लागला होता. 2008 ते 2010 पर्यंत टेलर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून आयपीएल खेळला. तर 2011 साली तो राजस्थान रॉयल्समध्ये गेला. त्याच मोसमात शून्यावर बाद झाल्यामुळे संघमालकानं चेष्टेने त्याच्या श्रीमुखात लगावल्याचा उल्लेखही त्यानं केला आहे. ही बाब गंभीर नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या एका व्यावसायिक खेळाडूशी अशा प्रकारे वागणं योग्य नव्हतं असं रॉसनं आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
First published:

Tags: Autobiography, Ipl, Rahul dravid

पुढील बातम्या