• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • हिटमॅनला टी20 मध्ये द्विशतक करण्याची संधी होती पण...

हिटमॅनला टी20 मध्ये द्विशतक करण्याची संधी होती पण...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं नावावर असलेल्या रोहित शर्माला टी20 मध्येही द्विशतक करण्याची संधी होती.

 • Share this:
  मुंबई, 03 मे : कोरोनामुळे जगभरातील सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. यामुळे इतर अनेक क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. क्रीडा क्षेत्रात काही स्पर्धांचे आयोजन पुढे ढकलण्यात आलं  तर काही स्पर्धा रद्द कऱण्यात आल्या आहेत. यामुळे जगभरातील खेळाडू सध्या घरातच अडकले आहेत. या वेळेत अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय दिसतात. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हासुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. हिटमॅन अशी ओळख असेलल्या रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतकं करण्याचा विक्रम आहे. सुरुवातीला धीमी फलंदाजी करणारा रोहित नंतर आक्रमक फटकेबाजी करतो. एका लाइव्ह चॅटवेळी त्यानं टी20 मध्येही आपल्याला द्विशतक करण्याची संधी होती असं म्हटलं आहे. रोहितने 2017 मध्ये झालेल्या टी20 सामन्याबद्दल सांगितलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात इंदौरमध्ये टी20 सामना झाला होता. त्यावेळी रोहितनं टी20 मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. अवघ्या 35 चेंडूत त्यानं 100 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित 43 चेंडूत 118 धावांवर बाद झाला. त्या सामन्यात जर तो बाद झाला नसता तर द्विशतक करता आलं असतं. हे वाचा : एकही मॅच नाही तरी टीम इंडियानं गमावलं सिंहासन, 2016 नंतर पहिल्यांदा घडला प्रकार रोहित म्हणाला की,'माझ्याकडं द्विशतक कऱण्याची संधी होती. मी बाद झालो त्यानंतर अजुनही बरीच षटकं बाकी होती. त्यामुळं मी एक चांगली संधी गमावली. मात्र 35 चेंडूत 100 धावा हे काही वाईट नव्हतं म्हणूनच मी समाधानी आहे.' रोहित बाद झाला तेव्हा सामन्यात 7 षटकांचा खेळ बाकी होता. त्यामुळे त्याआधी वादळी खेळी करणाऱ्या रोहितला द्विशतकाचा टप्पा गाठणं शक्य झालं असतं. हे वाचा : रोहित शर्माची कोलकाता शहरातली ही भानगड माहीत आहे का?
  Published by:Suraj Yadav
  First published: