Home /News /sport /

'विराटला चुकताना पाहण्यात मजा आली', गोलंदाजाने कोहलीच्या जखमेवर चोळलं मीठ

'विराटला चुकताना पाहण्यात मजा आली', गोलंदाजाने कोहलीच्या जखमेवर चोळलं मीठ

न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट एकदाही तळपली नाही. त्याला कसोटी मालिकेत चार डावात मिळून फक्त 38 धावाच करता आल्या.

    ख्राइस्टचर्च, 01 मार्च : न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाची टी 20 मालिकेत फक्त सरशी झाली. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताच्या संघाची दाणादाण उडाली आहे. एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघाला कसोटीमध्ये व्हाइटवॉश टाळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी भारताची अवस्था दुसऱ्या डावात 6 बाद 90 अशी झाली आहे. यात विराट कोहली पुन्हा एकदा अपयसी ठरला. तो 14 धावांवर बाद झाला. त्याबद्दल न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने रविवारी दुसऱ्या दिवशी सांगितलं की, कोहलीसारखे दिग्गज फलंदाज दबावात येऊन चुका करतात ते पाहणं खूप चांगलं होतं. न्यूझीलंडच्या संघाने कसोटी मालिकेत कोहलीला मोठी खेळी करू दिली नाही. त्याला चारही डावात 20 पेक्षा जास्त धावांची खेळी करता आली नाही. ट्रेंट बोल्ट म्हणाला की,'कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे यात काही शंका नाही. त्यांच्या संघाने बाउंड्री बॉल मर्यादित टाकून त्याच्यावर दबाव ठेवला. कोहलीला दबावात आणि चुका करताना पाहण्याचा अनुभव चांगला होता. भारतीय संघाला संथ खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यांना या खेळपट्टीवर खेळणं कठिण होतं. जर याच पद्धतीने मी भारतात गोलंदाजी करायला गेलो तर परिस्थिती वेगळी असेल', असंही ट्रेंट म्हणाला. स्विंग गोलंदाजीवर खेळताना भारतीय फलंदाजांची दमछाक होत होती. यात विराटची अवस्था तर खूपच बिकट झाली. विराटने कसोटी मालिकेत 100 पेक्षा कमी चेंडू खेळले. एकूण चार डावात त्याला 38 धावाच करता आल्या. कसोटी कारकिर्दीत 50 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या विराटला या मालिकेत 9.50 च्या सरासरीने धावा करता आल्या. हे वाचा : टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा न्यूझीलंड दौर्‍यात विराटने (एकदिवसीय आणि टी-20) केवळ एका अर्धशतकासह 204 धावा केल्या. टी -20 च्या 4 सामन्यांमध्ये त्याने 125 धावा आणि 3 एकदिवसीय सामन्यात 75 धावा केल्या. कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे हे प्रथमच नाही. यापूर्वी, फेब्रुवारी 2014 ते ऑक्टोबर 2014 या काळात तिन्ही फॉर्मेटमध्ये 25 डावांनंतर एकही शतक लगावले नाही. यात इंग्लंड दौर्‍याचाही समावेश आहे. ज्यामध्ये तो 5 कसोटी सामन्यात केवळ 134 धावा करू शकला. हे वाचा : जडेजाने घेतला ‘सुपरमॅन’ कॅच, पण व्हायरल होतोय धोनी! काय आहे भानगड
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या