जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'हे' परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी प्लेयर्सचाही समावेश

'हे' परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी प्लेयर्सचाही समावेश

'हे' परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी प्लेयर्सचाही समावेश

विविध देशांतील क्रिकेटर्सनी भारतीय मुलींशी (Indian Girls) लग्नं केली आहेत म्हणजे ते भारताचे जावाई झाले आहेत. स्पोर्ट्स गलियारानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    नवी दिल्ली, 7 मे : क्रिकेट (Cricket) हा जागतिक स्तरावर सर्वाधिक खेळला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. भारतामध्ये तर क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्याकडे क्रिकेटचे चाहते तर त्यालाच धर्म मानतात. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटला ग्लॅमर (Glamor) प्राप्त झालं आहे. त्यामुळे साहजिकच खेळाडूंनादेखील मोठ्या प्रमाणात पैसा (Money) आणि प्रसिद्धी (Fame) मिळाली आहे. काही क्रिकेटर्सना तर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या लिस्टमध्येही स्थान मिळवणं शक्य झालं आहे. भारतामध्ये आपल्या क्रिकेटर्सप्रमाणे परदेशी खेळाडूंचंही (Foreign players) मोठं फॅन फॉलोईंग आहे. आयपीएलमुळे (IPL) परदेशी खेळाडूंना भारतात पूर्वीपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळत आहे. अनेक परदेशी किक्रेटर्सना (Foreign Cricketers) भारत म्हणजे आपलं ‘सेकंड होम’ वाटतं. टूर्नामेंट आणि सुट्ट्यांच्यानिमित्ताने ते बराच काळ भारतात वास्तव्य करतात. काही परदेशी खेळाडूंनी तर आणखी पुढे जात भारताशी नातेसंबंध (Relationship) जोडले आहेत. विविध देशांतील क्रिकेटर्सनी भारतीय मुलींशी (Indian Girls) लग्नं केली आहेत म्हणजे ते भारताचे जावाई झाले आहेत. स्पोर्ट्स गलियारानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतीय मुलींशी लग्न (Marriage) करणाऱ्या परदेशी क्रिकेटर्समध्ये श्रीलंकन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश प्लेयर्सचा समावेश होतो. विशेष म्हणजे आतापर्यंत दोन पाकिस्तानी प्लेयर्सनीदेखील भारताशी नातेसंबंध जोडले आहेत. भारताचे जावई (Son-in-Law) असलेल्या क्रिकेटर्सची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. 1) माईक ब्रेअरली - इंग्लंडचे माजी कर्णधार माईक ब्रेअरली (Mike Brearley) यांनी भारतीय मुलीशी लग्न केलं आहे. 1976-77 च्या दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले माईक तेव्हा माना (Mana) साराभाई यांना भेटले होते. दोघांनी लग्न केलं आणि सध्या ते इंग्लंडमध्ये राहतात. माईक आणि माना यांना दोन मुलं आहेत. 2) मुथय्या मुरलीधरन - आपल्या ऑफ स्पिन बॉलिंगनं भारतीय प्लेयर्सची विकेट घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरनला (Muttiah Muralitharan) प्रेमाच्या मैदानात मात्र एका भारतीय मुलीने क्लिन बोल्ड केलं आहे. मुथय्या मुरलीधरननं चेन्नईतील मधिमलर रामामूर्ती (Madhimalar Ramamurthy) हिच्याशी लग्न केलं आहे. मधिमलर ही बिझनेसमन नित्या आणि एस. रामामूर्ती यांची मुलगी आहे. आई हे तुझ्यासाठी.. लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंची जर्सी पाहून तुमचंही उर भरुन येईल! पहा VIDEO 3) शॉन टेट - ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर असलेल्या शॉन टेटनं (Shaun Tait) माशूम सिंघा (Mashoom Singha) या भारतीय मुलीशी लग्न केलं आहे. हे दोन्ही लव्ह बर्ड 2010 मध्ये एका आयपीएल पार्टीत एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. सिंघा एक अँकर आणि मॉडेल आहे. 4) शोएब मलिक – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ही जोडी लोकप्रिय स्पोर्ट्स कपलपैकी एक आहे. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या शोएबनं भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगा आहे. 5) हसन अली - पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीनं (Hasan Ali) आपल्या सहकाऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय मुलीशी लग्न केलं. हरियाणातील सामिया (Samiya) आरजूसोबत हसन अलीनं लग्न केलं आहे. सामिया आणि हसनची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं. सामिया इंजिनीअर आहे. राजस्थान रॉयल्स टीमची मोठी चूक! सामन्याच्या मधेच अंपायरने खेळाडूला काढलं बाहेर 6) ग्लेन मॅक्सवेल - भारतीय मुलींशी लग्न करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीमध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हे आणखी एक नाव सामील झालं आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार खेळाडूनं 18 मार्च 2022 रोजी विनी रमण (Vini Raman) या भारतीय मुलीशी लग्न केलं. फार्मासिस्ट असलेल्या विनीचा जन्म मेलबर्नमध्ये झालेला असून ती मूळची भारतीय आहे. या जोडप्यानं ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलं आहे. याशिवाय, इतर काही परदेशी खेळाडू भारतीय मुलींसोबत रिलेशनशीपमध्ये देखील होते. यामध्ये वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात