नवी दिल्ली, 13 मे : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा एखाद्या युद्धापेक्षा कमी नसते. त्यात आता विश्वचषकात जर हे दोन संघ एकमेकांसमोर येऊन उभे राहिले तर, चाहत्यांसाठी हा सामना म्हणजे पर्वणीच असते. मात्र आता विश्वचषकाच्या सामन्याआधीच या दोन संघात एक वेगळा सामना पाहायला मिळत आहे. आजकाल क्रिकेटच्या मैदानात कोणताही खेळाडू हा फक्त त्याच्या कौशल्याच्या बळावर नाही तर, फिटनेसवरही तेवढाच चालतो. आज टॉप संघांमध्ये इंग्लंड, साऊथ आफ्रिका हे संघ असले तरी, त्यांचे खेळाडूही विश्वचषकाआधी दुखापतींमुळं त्रस्त असतात. दरम्यान आयपीएलमुळं भारतीय खेळाडूंवरही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली. आयपीएलमुळं भारतीय खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळं आता विश्वचषकाला केवळ 25 दिवस उरले असताना, आता भारतीय संघाला पाकिस्तानचा संघ टक्कर देत आहे. याआधी पाकिस्तानचा संघ तंदुरुस्त नसल्याचा ठप्पा त्यांच्यावर लावला जात होता. मात्र आता पाकिस्तानचा प्रशिक्षक ग्रान लुडेन यांनं पाकिस्तानचा संघ सर्वात तंदुरुस्त संघ असल्याची कबुली दिली आहे. यो-यो टेस्टमध्ये पाकिस्तान अव्वल पाकिस्तानचा फिटनेस प्रशिक्षक ग्रान लुडेन यांनं पाकिस्तानच्या संघाच्या फिटनेसबद्दल वक्तव्य केलं आहे. क्रिकेटमध्ये यो-यो ही महत्त्वाची टेस्ट मानली जाते. यातून खेळाडू किती तंदुरुस्त आहे हे कळते. दरम्यान पाकिस्तान संघाला यो-यो टेस्ट पास करण्यासाठी 17 : 1 आकडा पार करणे महत्त्वाचे होते, मात्र आता हा आकडा 17 : 4 असा करण्यात आला आहे. मात्र विश्वचषकासाठी हा आकडा आता 18 : 1 असा करण्यात आला आहे. एवढचं नाही तर, पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिजवान यानं यात 21 गुण मिळवले आहेत. वाचा- World Cup : आयपीएल गाजवणारे ‘हे’ 10 विदेशी खेळाडू आता उडवतील विराटची झोप भारतीय संघही मागे नाही भारतीय संघाच्या फिटनेसबद्दल बोलायचे झाल्यास विराटसेनाही तंदुरुस्त आहे. मात्र आयपीएलच्या बाराव्या हंगामामुळं काही भारतीय खेळाडूंना दुखापतींना समोरे जावे लागले. दरम्यान भारतीय संघाकडे कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे फिट खेळाडू आहेत. मात्र यो-योचे आकडे पाहता पाकिस्तानचा संघ भारतीय संघाच्या पुढे आहे. भारतीय संघाचा यो-यो टेस्टचा आकडा 16.1 आहे. तर, भारतीय कर्णधार विराट कोहलीचे गुण 19 आहेत. काय आहे यो-यो टेस्ट खेळाडूंची फिटनेस पाहण्यासाठी यो-यो टेस्ट केली जाते. यो-यो टेस्ट ही बीप टेस्टच्या पुढची टेस्ट आहे. यात 20-20 मीटरच्या दोन रांगा तयार करुन खेळाडूंना या रागांच्यामध्ये धावने बंधनकारक असते. एका बाजूनं खेळाडूचा पाय मागच्या बाजूला असतो, तर दुसऱ्या बाजूनं त्याला धावावे लागते. यात प्रत्येक मिनीटांत आपली गती वाढवावी लागते आणि जर खेळाडू वेळेवर त्या रांगेत पोहचला नाही तर, त्याला दोन बीप्सच्यामध्ये लाईन गाठायची असते. हे सगळं करण्यात खेळाडू अयशस्वी झाला तर, तो या टेस्टमध्ये नापास होतो. वाचा- IPL 2019 : यंदाच्या हंगामात विदेशी खेळाडू ‘हिट’ तर, भारतीय खेळाडू ‘फेल’ वाचा- MI vs CSK : …म्हणून नीता अंबानी आणि रितीका यांनी पाहिला नाही मुंबईच्या विजयाचा ‘तो’ क्षण मुंबई इंडियन्सच्या जल्लोषाचा पहिला EXCLUSIVE VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







