नवी दिल्ली : प्रसिद्ध विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या कारला भयंकर अपघात झाला. या अपघातात जबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर BMW कार आधी डिव्हायडरवर आदळली आणि नंतर गाडीला भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास पंत उत्तराखंडहून दिल्लीला निघाला असताना गुरुकुल नरसन परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने 108 क्रमांकावर फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी गाडीची आग विझवली. ऋषभ पंतला डेहराडून मॅक्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जर पंत वेळीच गाडीतून बाहेर पडू शकला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असंही तो म्हणाला.
rishabh pant : ऋषभ पंतची BMW कार रस्त्यावरून जळत होती, घटनास्थळाचा भयंकर LIVE VIDEO
पंत म्हणाला की गाडी मी स्वत: चालवत होतो. ड्राईव्ह करताना मला एक सेकंद डुलकी लागल्यासारखं झालं. काही कळण्याआत गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरवर धडकली. याच कारणामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर मी विंड स्क्रीन तोडून आपला जीव वाचवल्याचं देखील त्याने सांगितलं.
ऋषभ पंतच्या कारचा भयंकर अपघात, अपघाताचा LIVE VIDEO आला समोर#RishabhPant #RishabhPantAccident #ऋषभपंत pic.twitter.com/zBobs5IpnY
— News18Lokmat (@News18lokmat) December 30, 2022
Rishabh Pant Car Accident :BMW ला प्रचंड गती आणि एका सेकंदात....ऋषभ पंतच्या अपघाताचा LIVE VIDEO
या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. पंतचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. पंतवर प्लॅस्टिक सर्जरी देखील करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Cricket, Rishabh pant, Sport