मुंबई, 11 डिसेंबर : चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता हे सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडतात. आता त्यांनी ऋषभ पंतने केलेल्या ड्रीम इलेव्हनच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. ड्रीम 11 ची जाहिरात असभ्य आणि अपमानास्पद असल्याचं म्हणत हंसल मेहता यांनी संताप व्यक्त केला आहे.
जाहिरातीत ऋषभ पंत शास्त्रीय गायन करत असल्याचं दाखवलं असून त्यात तो बेसूरपणे गातो. त्यानंतर अचानक विकेटकिपरप्रमाणे चेंडू झेलायला लागतो. हंसल मेहता यांनी ही जाहिरात म्हणजे संगीत कलेचा अपमान असल्याचं म्हटलंय.
This is a disgusting and disrespectful commercial. Pimp yourself but not at the cost of ridiculing art and it’s rich traditions. I demand that @Dream11 pulls this down. pic.twitter.com/a9KIs23heL
— Hansal Mehta (@mehtahansal) December 10, 2022
हेही वाचा : सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत
ट्विटरवर हंसल मेहता यांनी म्हटलं की, ही एक असभ्य आणि अपमानास्पद अशी व्यावसायिक जाहिरात आहे. स्वत:ची जाहिरात करा पण समृद्ध परंपरेचा आणि कलेचा अपमान करून किंवा खिल्ली उडवून नाही. माझी ड्रीम 11 कडे मागणी आहे की ही जाहिरात हटवावी.
हेही वाचा : FIFA : सेमीफायनलचे ४ संघ ठरले, दोन मित्र एकमेकांशी भिडणार
हंसल मेहता यांच्या ट्विटवर लेखक मुनीश भारद्वाज यांनीही प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी म्हटलं की, हे वाईट आहे हे मी मान्य करतो पण ही जाहिरात हटवण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तोपर्यंत असायला हवं जोपर्यंत कोणती हिंसा किंवा कोणाला नुकसान होत नाही. कला आणि तिची समृद्ध परंपरा नेहमीच राहिल पण अशा पद्धतीने मूर्खपणा असलेल्या जाहिराती लवकरच विस्मरणात जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement, Cricket, Rishabh pant