मुंबई, 28 जुलै: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) रत्नागिरीच्या दीप्ती विश्वासराव (Dipti Vishwasrao) या 19 वर्षांच्या तरूणीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढं केला आहे. आर्थिक अडचणीमुळे दीप्तिला मेडिकलचं शिक्षण घेण्यात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तिच्या परिस्थितीची माहिती होताच सचिननं तिला शिक्षणासाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. आता सचिनच्या मदतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील झरे या गावातील पहिली डॉक्चर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
दीप्तीचा संघर्षाचा प्रवास
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीप्तिला लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गावात नेटवर्कचा प्रश्न असल्यानं तिला ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नव्हते. मोबाईलला नेटवर्क शोधण्यासाठी तिने कित्येक किलोमीटर पायपीट केली आहे. या सर्व अडचणींवर मात करत तिनं राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत (NEEET) 720 पैकी 574 मार्क्स मिळवले.
दीप्तीला तिच्या गुणवत्तेच्या जोरावर अकोल्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्याकडून पैसे उधार घेत दीप्तीनं कॉलेजची फी भरली. पण, हॉस्टेल आणि जेवणाच्या मेसचे पैसे कसे भरायचे? हा प्रश्न तिला पडला होता.
दीप्तीची ही व्यथा सचिनला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजली. त्यानंतर सचिन आणि त्याच्या सेवा फाऊंडेशन या संस्थेनं तिला स्कॉलशिप देण्याचा निर्णय केला असून यामध्ये दीप्तीच्या मेडिकल शिक्षणासह हॉस्टेलच्या संपूर्ण खर्चाचा समावेश आहे. सचिननं केलेल्या मदतीबद्दल दीप्तीनं त्याचे आभार मानले आहेत.
' मला स्कॉलरशिप देण्यासाठी मी सचिन तेंडुलकरच्या फाऊंडेशनची आभारी आहे. ही स्कॉलरशिप माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च कव्हर करणार आहे. त्यामुळे आता मी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकेल. डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी यापुढे कठोर मेहनत घेईल. तसेच भविष्यात हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेन,' असं दीप्तीनं सांगितलं आहे.
कॉलर पकडली, मग थोबाडीत लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL
सचिन तेंडुलकरनं देखील यावेळी ट्विट करत दीप्तीचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर तिला भविष्यासाठी शूभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या फाऊंडेशननं आजवर चार राज्यांमधील 833 मुलांना आर्थिक मदत प्रदान केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar