मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन

IPL 2021: इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन

मुंबई इंडियन्सचा आक्रमक बॅटर इशान किशन (Ishan Kishan) याने आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) शेवटच्या लीग मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) 84 रनची वादळी खेळी केली.

    मुंबई, 9 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्सचा आक्रमक बॅटर इशान किशन (Ishan Kishan) याने आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) शेवटच्या लीग मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) 84 रनची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सनं हैदराबादचा 42 रननं पराभव केला. इशाननं यापूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धही आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं. या दोन खेळीमुळे त्याची T20 वर्ल्ड कपमधील जागा पक्की झाली असून तो अनुभवी खेळाडू के.एल. राहुलची (KL Rahul) जागा घेण्याची चिन्हं आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध झालेल्या मॅचनंतर इशान किशनशी विराट कोहलीनं (Virat Kohli) सविस्तर चर्चा केली होती. टीम इंडियाच्या कॅप्टनशी झालेल्या चर्चेचा तपशील इशाननं शुक्रवारी सांगितला. 'तुझी ओपनर म्हणून टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यासाठी तयार राहा', असे विराटने आपल्याला सांगितल्याचा गौप्यस्फोट इशाननं केला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलच्या जागी इशान किशनला ओपनिंगला पाठवण्याची विराटची योजना असल्याचं उघड झालं आहे. 'मी आज सकारत्मकतेनं बॅटींग केली. 250-260 पर्यंत जाण्याचे आमचे ध्येय होते. टी20 वर्ल्ड कपपूर्वी फॉर्मममध्ये येणं ही चांगली गोष्ट आहे. मी माझ्या टीमसाठी (MI) देखील रन केले. मला ओपनिंग करायला आवडते. माझी ओपनर म्हणूनच टीम इंडियात निवड झाल्याचं विराट भाईनी सांगितलं. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये मैदानात उतरण्याची गरज आहे. विराट भाईशी माझं चांगलं बोलणं झालं. जसप्रीत भाईनीही माझी मदत केली. या स्पर्धेत झालेल्या चुका टी20 वर्ल्ड कपमध्ये करायच्या नाहीत, हे मी शिकलो असल्याचं इशाननं सांगितलं. इशान किशन सुसाट; अवघ्या १६ चेंडूत झळकावले अर्धशतक टीम इंडियाला फायदा इशान किशन हा टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील एकमेव डावखुरा बॅटर आहे. तसंच तो आक्रमक देखील खेळतो. त्यामुळे रोहित शर्मा आणि केएल राहुल या एकसारख्या पद्धतीनं खेळणाऱ्या बॅटरपेक्षा त्याला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय उपयुक्त ठरू शकतो. टीमला आक्रमक सुरुवात करण्याची जबाबदारी इशानवर सोपवली तर ती यशस्वी करण्याची धमक त्याच्यात आहे. हे त्यानं आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या दोन मॅचमध्ये दाखवून दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Ishan kishan, T20 world cup

    पुढील बातम्या