• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट

IPL 2021: हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट

आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या फेजमध्ये हार्दिकनं एकही ओव्हर न टाकल्यानं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपचं (ICC T20 World Cup 2021) काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. हा वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपवणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या फेजमध्ये हार्दिकनं एकही ओव्हर न टाकल्यानं हा प्रश्न निर्माण झाला आहे. हार्दिकच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने केलेला खुलासा टीम इंडियाची काळजी वाढवणारा आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) या मॅचनंतर रोहितनं हार्दिकच्या फिटनेसचे अपडेट दिले. हार्दिक अजून बॉलिंगसाठी पूर्ण तयार नसल्याचं रोहितनं सांगितल्यानं विराटची काळजी वाढली आहे. रोहितनं यावेळी सांगितलं की, 'हार्दिक पांड्यानं अजून बॉलिंग सुरू केलेली नाही. फिजियो, ट्रेनर्स आणि मेडिकल टीम त्याच्यासोबत काम करत आहे. त्यानं आजवर एकही बॉल टाकला नाही, इतकंच मला माहिती आहे. आम्ही प्रत्येक मॅचनंतर त्याचा फिटनेसचा आढावा घेतला आहे. त्याच्यात दर दिवशी सुधारणा होत आहे. त्यामुळे आगामी आठवडाभरात तो बॉलिंग करण्यासाठी तयार होईल, अशी आशा आहे. पण, याबाबत अचूक माहिती डॉक्टर किंवा फिजियोच देऊ शकतात.' 'या' 3 खेळाडूंबाबत निवड समितीनं केली चूक, T20 वर्ल्ड कपमध्ये बसणार फटका! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन मॅच हार्दिक पांड्या फिटनेसमुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या एकाही मॅचमध्ये त्यानं बॉलिंग केलेली नाही. हार्दिक हा टीम इंडियातील एकमेव फास्ट बॉलर ऑल राऊंडर आहे. तो बॉलिंग करत नसल्यानं टीम इंडियाच्या संतुलनावर परिणाम होणार आहे. इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन हार्दिक बॅटींगवर खूश नाही हार्दिकच्या फिटनेसाचा परिणाम त्याच्या बॉलिंगसह बॅटींगवरही होत आहे. आयपीएलच्या दुसऱ्या फेजमध्ये ही गोष्ट जाणवली आहे. हार्दिक स्वत:ही आयपीएलमध्ये त्यानं केलेल्या बॅटींगवर खूश नाही, असं रोहित शर्मानं सांगितलं. तो सध्या थोडा निराश नक्कीच आहे.पण  तो एक जबरदस्त खेळाडू आहे, यात शंका नाही. त्यानं यापूर्वीही कठीण परिस्थितीमध्ये पुनरागमन केलं आहे.' असं रोहितनं सांगितलं.
  Published by:News18 Desk
  First published: