मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup: ‘तो’ पुन्हा येणार…! श्रीलंकेच्या महान फलंदाजानं केलं भाकित!

Asia Cup: ‘तो’ पुन्हा येणार…! श्रीलंकेच्या महान फलंदाजानं केलं भाकित!

विराट कोहली

विराट कोहली

Asia Cup: “Class is permanent and form is temporary. मला विश्वास आहे की कोहली यातून बाहेर येईल. त्यानं याआधी आपल्या कारकीर्दीत खूप चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तो पुन्हा चांगला कमबॅक करेल.” - महेला जयवर्धने

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 10 ऑगस्टयेत्या 27 ऑगस्टपासून भारतीय संघाचं मिशन आशिया कप सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघांची नुकतीच घोषणाही करण्यात आली. यूएईत खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विजेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी सज्ज झाला आहे. याच स्पर्धेआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज महेला जयवर्धनेनं फॉर्ममध्ये नसलेल्या एका खेळाडूविषयी भाष्य केलंय. आणि तो पुन्हा फॉर्मात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विराट पुन्हा फॉर्ममध्ये येणार!’ जयवर्धनेनं हे विधान केलंय टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज विराट कोहलीविषयी. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. पण आशिया चषकात विराट पुन्हा फॉर्मात येईल असं महेला जयवर्धनेला वाटतं. आयसीसीशी बोलताना जयवर्धने म्हणाला की “Class is permanent and form is temporary. मला विश्वास आहे की कोहली यातून बाहेर येईल. त्यानं याआधी आपल्या कारकीर्दीत खूप चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तो पुन्हा चांगला कमबॅक करेल.” विराटची फॉर्मशी झुंज गेल्या तीन वर्षात विराट कोहलीनं एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही. वन डे, कसोटी आणि टी20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये आजवर त्यानं 70 शतकं ठोकली आहेत. पण त्यानं शेवटचं शतक करुन आता जवळपास तीन वर्ष लोटली आहेत. गेल्या काही सामन्यात तर विराटच्या धावा 20-25च्या पुढे गेल्याच नाहीत. पण आशिया चषकात पूर्वीचा विराट पुन्हा दिसेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे. हेही वाचा - Sara Tendulkar: रक्षाबंधनाआधीच सारा तेंडुलकरला अर्जुननं दिलं खास गिफ्ट! भारताची सलामी पाकशी यंदाच्या आशिया चषकात भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 28 ऑगस्टच्या संध्याकाळी हा सामना खेळवण्यात येईल. आशिया चषकासाठीचा भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान
First published:

Tags: Sports, T20 cricket, Virat kohali

पुढील बातम्या