दुबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्डकप (T20World Cup) स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड विरद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्सनी टीम इंडियासह शास्त्रींनादेखील (Ravi Shastri) ट्रोल केले आहे. रविवारी न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील टीम इंडियाला 8 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी, टी20 वर्ल्डकप (T20World Cup) स्पर्धेत पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियाच्या या निराशजनक कामगिरीवर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चाहत्यांसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील(Ravi Shastri) नाराज असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या नाराजीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रवी शास्त्री यांच्यावरील बरेचसे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यानंतर देखील त्यांना ट्रोल केले जात आहे. एका युजरने त्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “रवी शास्त्री यांचा चेहरा पाहून तर असच वाटतंय की, रवी शास्त्री यांना आधीच कल्पना असेल की, भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.”
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “नवीन मुख्य प्रशिक्षक येणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री नाराज आहेत.” तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “असे वाटते की, रवी शास्त्री यांना ते सर्व माहीत आहे जे आपल्याला माहीत नाही. समालोचन कक्षात तुमचे स्वागत आहे.”
यंदाची टी20 वर्ल्डकप स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक
रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर दोनदा कसोटी मालिकेत पराभूत केले. त्याचवेळी प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळवण्यात आला. मात्र अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. यंदाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शास्त्री आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळही संपवतील, अशी अपेक्षा होती. पण न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाला उपांत्य फेरीत कायम राहण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. भारताची खराब फलंदाजी पाहून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही (Ravi Shastri) नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युजर्सनी निशाणा साधला आहे.