मुंबई, 7 जून : मुंबईकर सर्फराज खानचा (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफी स्पर्धेतील जबरदस्त फॉर्म कायम आहे. मुंबई विरूद्ध उत्तराखंड (Mumbai vs Uttrakhand) यांच्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेची क्वार्टर फायनल (Ranji Trophy quarter final) सुरू आहे. या क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या दिवशी सर्फराजनं शतक झळकावलं आहे. सर्फराजनं उत्तराखंड विरूद्ध 140 बॉलमध्येच शतक झळकावलं. त्याचं या सिझनमधील हे तिसरं शतक आहे.
सर्फराजनं यावेळी या सिझनमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम देखील केला आहे. सर्फराजनं फक्त 5 इनिंगमध्ये 140.80 च्या सरासरीनं 704 रन केले आहेत. सर्फराज गेल्या दोन वर्षांपासून भन्नाट फॉर्ममध्ये असून त्यानं गेल्या 13 इनिंगमध्ये एक त्रिशतक, दोन द्विशतक आणि दोन शतक झळकावले आहे. या सिझनमध्ये त्याचा स्ट्राईक रेट देखील 70 पेक्षा जास्त आहे. देशांतर्गत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सातत्यानं रन करणाऱ्या सर्फराजला टीम इंडियाच्या टेस्टमध्ये कधी संधी मिळणार? कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) त्याच्या नावाचा कधी आग्रह करणार? राष्ट्रीय निवड समिती त्याला कधी न्याय देणार? हे प्रश्न आता विचारले जात आहेत.
Photo : ऋषभ पंतचं सुटलं पोट, फॅन्सनी दिला दिल्लीच्या 'या' डिशला दोष!
सर्फराजनं सावरलं
सर्फराजनं उत्तरखंड विरूद्ध 11 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. तो 205 बॉलमध्ये 14 फोर आणि 4 सिक्ससह 153 रन काढून आऊट झाला. त्यानं यावेळी सुवेद पारकरसोबत चौथ्या विकेटसाठी 277 रनची दमदार भागिदारी केली. या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉनं (Prithvi Shaw) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता.
कॅप्टन पृथ्वी शॉ 21 रन काढून आऊट झाला. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल गाजवणारा यशस्वी जयस्वालही 35 रन काढून परतला. अरमान जाफरनं चांगला प्रतिकार करत 60 रनची खेळी केली. त्यानंतर सुवेद पारकर आणि सर्फराज खान या जोडीनं उत्तराखंडला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. नवोदीत सुवेदनंही यावेळी शतक झळकावलं. सर्फराज आणि सुवेदच्या शतकामुळे मुंबईनं 450 रनचा टप्पा ओलांडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.