मुंबई, 7 जून : महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) टीम इंडियातील उत्तराधिकारी कोण ? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. अंडर 19 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या ऋषभ पंतनं (Rishabh Pant) ती जागा पटकावलीय. पंतच्या खेळावर सुरूवातीला टीका झाली. परंतु त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्व टीकाकारांचं तोंड बंद केलं. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या कसोटी मालिकेतही पंतनं झुंजार शतक झळकावलं होतं. ‘दिल्ली कॅपिटल्स’चा कॅप्टन असलेल्या पंतनं समवयस्क खेळाडूंसोबतच दिनेश कार्तिकसारख्या सिनिअर खेळाडूवर मात करत टीम इंडियातील जागा निश्चित केली आहे. तो सध्या तीन्ही फॉर्मेटमधील भारतीय टीमचा पहिल्या पसंतीचा विकेट किपर आहे. ऋषभ पंतनं टीम इंडियातील जागा निश्चित केली असली तरी त्याचं वाढतं वजन हे फॅन्सच्या काळजीचा विषय आहे. आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरचं (Deepak Chahar) लग्न झालं. चहरनं त्याची गर्लफ्रेंज जया भारद्वाजसोबत लग्न केलं. त्यांच्या रिस्पेशनला ऋषभ पंतसह अनेक भारतीय क्रिकेटपटू उपस्थित होते.
Many Indian players attended the reception of Deepak Chahar's wedding. pic.twitter.com/gUl1oAZq06
— Johns. (@CricCrazyJohns) June 4, 2022
दीपक चहरच्या रिस्पेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऋषभ पंतचं पुढे आलेलं पोट फॅन्सच्या नजरेतून लपलं नाही. त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी पंतला सुटलेलं पोट कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तर हा पंतचा दोष नसून दिल्लीतील ‘छोले-भटूरे’ चा दोष आहे, असा टोलाही फॅन्सनी लगावला आहे.
Pants fitness at the age of 23 😬
— Pravin 😼 (@_itz__pravin) June 4, 2022
pant to aur mota hi hota ja rha hai 🤣🤣🤣
— Naveen Rai (@Ra1Naveen) June 4, 2022
Dilli mein jaise chhole bhature milte hain na bhai, u can't control it.
— Nimit (@nimitarora1991) June 4, 2022
ऋषभ पंतच्या कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सला यंदा आयपीएल स्पर्धेची ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आलं. दिल्लीला ‘प्ले ऑफ’ गाठण्यासाठी शेवटच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर विजय आवश्यक होता. पण, मुंबईनं त्यांचा 5 विकेट्सनं पराभव केला. त्या मॅचमध्ये पंतच्या चुकांचा फटका दिल्लीला बसला. ENG vs NZ : लॉर्ड्समधील पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू मालिकेतून आऊट आयपीएल स्पर्धेनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी पंतची टीम इंडियात निवड करण्यात आली असून तो सध्या दिल्लीमध्ये भारतीय टीमसोबत आहे. सोमवारी टीम इंडियानं केलेल्या सरावातही पंत सहभागी झाला होता.

)







