मुंबई, 06 डिसेंबर : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आशिया कपसाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी मोठं विधान केलंय. जर पाकिस्तान सरकारने संघाला सुरक्षेच्या कारणास्तव भारतात जाण्यास परवानगी दिली नाही तर काय होईल? आयसीसीने या प्रकरणात हस्तक्षेप न केल्यानं रमीज राजा यांनी नाराजी व्यक्त केलीय. रमीज राजा यांनी म्हटलं की, पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या संघाला भारतात जायला परवानगी दिली नाही तर काय होईल. कसोटी क्रिकेटला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची गरज आहे. तुम्ही पाहिलं असेल एमसीजीवर वर्ल्ड कपमधील सामन्यात ९० हजार चाहते आले होते. मी आयसीसीवर नाराज आहे. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा. हेही वाचा : केएल राहुल अष्टपैलू क्रिकेटर, असं का म्हणाले सुनिल गावस्कर? पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटलं की, क्रिकेटमुळे पाकिस्तान आणि भारताचे संबंध नेहमीच सुधारले आहेत. भारतीयांची इच्छा आहे की पाकिस्तानला भारतात क्रिकेट खेळताना बघायचं आहे. रमीज राजा यांच्यासह इतर माजी क्रिकेटपटूंनी याआधी भारतात वर्ल्ड कप न खेळण्याची धमकी दिली होती. जर पुढच्या वर्षी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आशिया चषकात खेळला नाही तर आमचा संघही भारतात वर्ल्ड कप खेळणार नाही असं म्हटलं होतं. हेही वाचा : पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला फायदा, WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी याआधी रमीज राजा यांनी म्हटलं होतं की, जर पाकिस्तान भारतातल्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला नाही तर तो कोण बघेल? जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला तर आम्ही वर्ल्ड कपसाठी जाऊ. ते आले नाही तर आम्ही वर्ल्ड कपशिवाय खेळू शकते. आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला पाकिस्तान क्रिकेटच्या अर्थव्यवस्थे सुधारणा करण्याची गरज आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.