मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

‘क्रिकेट खेळलास तर बोट कापून टाकेन’, भारताच्या स्टार गोलंदाजाला मिळाली होती धमकी

‘क्रिकेट खेळलास तर बोट कापून टाकेन’, भारताच्या स्टार गोलंदाजाला मिळाली होती धमकी

भारताच्या दिग्गज गोलंदाजाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी मिळाली होती धमकी.

भारताच्या दिग्गज गोलंदाजाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी मिळाली होती धमकी.

भारताच्या दिग्गज गोलंदाजाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी मिळाली होती धमकी.

  • Published by:  Priyanka Gawde
वेलिंग्टन, 16 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात 21 फेब्रुवारीपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारताच्या दिग्गज गोलंदाजाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पुनरागमन करताना दिसणार आहे. या सामन्याआधी अश्विनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या बालपणाशी संबंधित एक धक्कादायक घटना सांगितली आहे. क्रिकबझशी बोलताना अश्विनने, लहानपणी टेनिस बॉलशी खेळताना एकदा विरोधी संघातील एका खेळाडूनं धमकी दिली होती, असे सांगितले. वाचा-शुभमन गिल फेल तर पंत, पृथ्वीचा कमबॅक! न्यूझीलंडविरुद्ध कोणाला देणार विराट संधी अश्विनला विरोधी संघातील काही मुलांनी अंतिम सामना खेळला तर त्याचे बोट कापून टाकेन, अशी धमकी दिली होती. अश्विननं लहानपणीचा एक किस्सा सांगताना हा धक्कादायक खुलासा केला. अश्विनने, “माझा मित्र मला टेनिस बॉल स्पर्धेत खेळायला सांगायचे. माझ्या वडिलांना हे आवडले नाही. त्यांनी मला रस्त्यावर खेळण्यास बंदी घातली होती”, असे सांगितले. अश्विन 14-15 वर्षांचा असताना अंतिम सामना खेळण्यावरून त्याला धमकी देण्यात आली होती. हा प्रसंग सांगताना अश्विनने, “शाळेत असताना काही मुलांनी माझ्यासाठी इडली-वडाची ऑर्डर दिली. मी आनंदाने खात होते. त्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा मैदानात जात असताना मला काही मुलांना रोखलं. त्यांनी मला तू क्रिकेट खेळायचे नाहीस. खेळलास तर तुझं बोट कापू”, असे सांगितले. या मुलांच्या धमकीला घाबरून अश्विन सामनाही खेळला नव्हता. मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला टेनिस क्रिकेट खेळू दिले नाही. वाचा-रणजी ट्रॉफीच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं, इरफान पठाण म्हणाला,'अभिमानास्पद' भारताकडून अश्विनने 70 कसोटी सामन्यात 362 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने शेवटचा एकदिवसीय सामना 2017मध्ये खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. वाचा-20 किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूने मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
First published:

Tags: Cricket, R ashwin

पुढील बातम्या