पुणे, 08 मे : पुण्यातील क्रिकेट संग्रहालयानं पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार अजहर अलीची बॅट विकत घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्याची बॅट लिलावात ठेवण्यात आली होती. अजहरनं कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी पैसे जमवण्याकरीता त्याच्या दोन आठवणीतील वस्तू लिलावात ठेवल्या होत्या. यात त्यानं 2016 मध्ये विंडिजविरुद्ध 302 धावा केलेल्या बॅटचा समावेश होता. याशिवाय त्यानं भारताविरुद्ध 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खातलेली जर्सीसुद्धा होती.
अजहर अलीच्या बॅटवर आणि जर्सीवर पाकिस्तानच्या संपूर्ण क्रिकेट संघाच्या सदस्यांनी सह्या केल्या आहेत. अजहरनं सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. त्यानं बॅट आणि जर्सीसाठी प्रत्येकी दहा लाख किंमत ठेवली होती. यातून अजहरला 22 लाख रुपये मिळाले.
पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझिअमने दहा लाख रुपयांची बोली लावून बॅट खरेदी केली. लिलावात ठेवलेल्या जर्सीसाठी अनेकांनी बोली लावली. यामध्ये कॅलिफोर्नियात राहणाऱ्या पाकिस्तानी काश विलानी यांनी 11 लाख रुपयांची बोली लावली.
हे वाचा : हिटमॅनला टी20 मध्ये द्विशतक करण्याची संधी होती पण...
न्यू जर्सीत राहणाऱ्या एका पाकिस्तानी व्यक्तीने एक लाख रुपये दान केले. अजहरनं लिलाव सुरु केल्यानंतर ट्विट केलं होतं की, मी सध्या कोरोनाशी लढत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी दोन खास वस्तूंचा लिलाव करत आहे. त्याची बेसिक किंमत दहा लाख पाकिस्तानी रुपये आहे.
हे वाचा : मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket