इंफाळ, 21 जून : मुलाच्या यशाने पालकांची मान अभिमानाने उंचावते. त्यांच्या यशातच आपलं यश पालक मानत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप लेकीच्या या फोटोने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत. मणिपूर पोलिसात कार्यरत असलेल्या रत्ताना एनगासेप्पम आणि तिच्या वडिलांचा हा फोटो आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रत्ताना यांचे वडील तिच्या खांद्यावर असलेले स्टार पाहताना दिसत आहेत. मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहताना वडिलांना झालेला आनंद आणि मुलगी त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करताना दिसते. रत्ताना एनगासेप्पम मनिपूर पोलिसांत असून त्या इंफाळच्या पोलीस उप अधीक्षक आहेत. वडील तिच्या वर्दीवर असलेले स्टार चेक करत आहेत हे अभिमानास्पद आहे. रत्ताना हे स्टार अभिमानानं पाहणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांकडे पाहते असा कॅप्शन फोटोला देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत ट्विटरवर हा फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी सुद्धा बाप लेकीच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरनं म्हटलं की, खूपच सुंदर फोटो आहे. तर दुसऱ्यानं म्हटलं की, स्टार मेकर तिच्या वर्दीवर स्टार लावत असल्याचं रत्ताना बघत आहे. (हे वाचा- international yoga day : अंग गोठवणाऱ्या थंडीत जवानांची योगासनं, पाहा PHOTOS )

)







