कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या, 'या' कारणामुळे डॉक्टरांनी बहिष्कार टाकत काम केलं बंद

कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या, 'या' कारणामुळे डॉक्टरांनी बहिष्कार टाकत काम केलं बंद

पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दिग्गज देश मेटाकुटीला आहेत. अशातच कोरोनाचा शिरकाव झालेल्या पाकिस्तानची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट सर्व डॉक्टरांना देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ 'यंग डॉक्टर्स असोसिएशन'ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाची भारतात काय आहे स्थिती?

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 76 टक्के पुरुष, तर 24 टक्के महिला आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्येही 73 टक्के पुरुष आणि 27 टक्के महिलांचा समावेश आहे. चाळीशीच्या आतल्या 47 टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या 109 पैकी 63 टक्के नागरिक 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आहे.

देशातील जवळपास 280 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर पसरला आहे. सुमारे चार डझन जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती गंभीर आहे. सरकार 14 एप्रिलपर्यंत या सर्व जिल्ह्यांच्या स्थितीवर नजर ठेवेल. ज्या जिल्ह्यात आणि भागात संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यांना चिन्हांकित केले जाईल. 15 एप्रिलपासून अशा भागांना बफर झोन म्हणून घोषित केले जाईल.

देशपातळीवरील कोरोना व्हायरस संक्रमणाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रीगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून यामध्ये देशातील ज्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या राज्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच अनेक देश भारताकडे औषधांची मागणी करीत आहे त्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 09:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading