Home /News /videsh /

तबलिगींमुळे पाकमध्ये परिस्थिती बिघडली, वाचा कसा माजलाय हाहाकार

तबलिगींमुळे पाकमध्ये परिस्थिती बिघडली, वाचा कसा माजलाय हाहाकार

तबलिगी मरकजमुळे भारतात कोरोना मोठ्या संख्येने पसरला. मात्र फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही तबलिगींमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे.

    इस्लामाबाद, 06 एप्रिल : तबलिगी मरकजमुळे भारतात कोरोना मोठ्या संख्येने पसरला. मात्र फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही तबलिगींमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानमध्ये 20 हजार तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लाहोरमध्ये झालेल्या इस्लामिक बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने जमाती लोक धार्मिक मेळाव्यात गेले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तबलिगी जमात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची चौकशी किंवा अलग ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा कार्यक्रम लाहोरमध्ये 10-12 मार्च दरम्यान झाला आणि तेव्हापासून पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये कोरोना (कोविड-19) पसरण्याची शक्यता वाढली आहे. या सभेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. वाचा-दिल्लीतील मरकज प्रकरणावर अखेर शरद पवारांचं परखड भाष्य सभेमध्ये सामील झालेल्या लोकांचा शोध सुरू पाकचे प्रवक्ते अजमल वजीर यांनी एएफपीला सांगितले की, "आरोग्य अधिकारी सभेत सामील झालेल्यांचा शोध घेत आहेत आणि यातील काहींची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, देशातील मोठे महामार्ग बंद पडल्यामुळे त्याच्या प्रांतातील हजारो तबलिगी इतर भागात अडकले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील लाहोर शहरात 7 हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. तर, तर दक्षिण सिंध प्रांतात 8 हजार लोकांना. वाचा-11 वर्ष 31 देश शोधत होते उपाय, बंद केला रिसर्च आणि तीन महिन्यांतच धडकला कोरोना कोरोनाच्या भीतीने लोक घाबरले आहेत पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसने किमान 45 जणांचा बळी घेतला आहे. परंतु अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे की कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या जास्त आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती आणि असे प्रकार घडत आहेत हे मुस्लीम धार्मिक नेत्यांच्या आग्रहाचे परिणाम आहेत असा आरोप केला होता. त्याच वेळी आयोजकांनी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी धार्मिक सभा तहकूब केल्याचे सांगितले. वाचा-तबलिकी तरुणानं निजामुद्दीनला गेल्याची माहिती लपवली, पुण्यात तब्बल 40 डॉक्टरांना
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या