मुंबई, 8 जानेवारी : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने सर्वत्रच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. आज प्रपोज डे च्या निमित्ताने अनेक प्रियकर प्रेयसी त्यांच्या प्रेमाच्या व्यक्तीं पुढे आपल्या प्रेमाची कबुली देतात. क्रिकेटर्सच्या लव्ह स्टोरीज नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेकदा प्रेमात आकंठ बुडालेलया खेळाडूंनी त्यांच्या गर्लफ्रेंड्सला थेट मैदानातच प्रपोज केल्याचे प्रसंग घडले आहे. तेव्हा अशा क्रिकेटर्सच्या हटके प्रपोजलबद्दल जाणून घेऊयात.
दीपक चहर :
भारताचा स्टार खेळाडू दीपक चहर याने आयपीएल 2021 मध्ये चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यानंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला प्रपोज केले. जया या दरम्यान स्टेडियम मधील स्टॅण्डवर उभी होती. तेव्हा अचानकपणे दीपक तिच्या जवळ आला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. हे दोघे 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले.
Special and one of the best moment of my life #love pic.twitter.com/jsCEhiAUZY
— Deepak chahar (@deepak_chahar9) October 7, 2021
क्रुणाल पांड्या :
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर क्रुणाल पांड्याने देखील अशाच प्रकारे त्याची गर्लफ्रेंड पंखुरी शर्माला प्रपोज केले होते. 2017 मध्ये आयपीएलच्या फायनल मॅच दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळताना क्रुणाल पांड्याने खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या गर्लफ्रेंड पंखुरीला त्याने प्रपोज केले होते. त्याच वर्षी पंखुरी आणि क्रुणाल हे दोघे लग्नबंधनात अडकले.
किंचित शाह :
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँग विरुद्धचा सामना भारताने जिंकला. या सामन्यानंतर, भारतीय वंशाचा हाँगकाँगचा फलंदाज किंचित शाहने गुडघ्यावर बसून त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केला.
She said YES! A heartwarming moment where Hong Kong's @shah_kinchit95 proposed to his SO after playing a big match against India A huge congratulations to the happy couple. We wish you all the joy and happiness in your new life together ❤️#AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/CFypYMaPxj
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 31, 2022
सचिन बेबी :
https://www.youtube.com/watch?v=yDag2FR0IJc&t=87s
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी खेळाडू सचिन बेबीने 2016 मध्ये त्याच्या प्रेयसीला दीड वर्षे डेट केल्यानंतर प्रपोज केले होते. त्याने हे प्रपोजल त्याच्या प्रिव्हेडिंग शूट दरम्यान केले होते. यावेळी दोन्ही जोडप्याने आरसीबी संघाच्या जर्सी परिधान केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Krunal Pandya, Love story, Team india, Valentine week