मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pro Kabaddi League : अनेक टीमनी बदलले कॅप्टन! पाहा 8 व्या मोसमाची संपूर्ण यादी

Pro Kabaddi League : अनेक टीमनी बदलले कॅप्टन! पाहा 8 व्या मोसमाची संपूर्ण यादी

Pro Kabaddi League : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. अर्थात क्रीडा क्षेत्र (Sports) देखील याला अपवाद नाही. पण आता कोरोना नियंत्रणात असल्याने स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यातच प्रो-कबड्डीचा 8 वा सिझन (Pro Kabaddi League Season 8) 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. अर्थात क्रीडा क्षेत्र (Sports) देखील याला अपवाद नाही. दोन वर्षात कोरोनामुळे विविध खेळांचे सामने रद्द करण्यात आले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, क्रीडा क्षेत्रासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. यंदा आयपीएल, टी-20 विश्वचषकातील मॅचेस खबरदारीचा उपाय म्हणून भारताबाहेर खेळवल्या गेल्या. पण आता कोरोना नियंत्रणात असल्याने स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यातच प्रो-कबड्डीचा 8 वा सिझन (Pro Kabaddi League Season 8) 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. हा सिझन क्रीडा रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हा सिझन यंदा अतिशय वैशिष्टपूर्ण असेल, कारण कबड्डीच्या चाहत्यांना 2 वर्षानंतर खेळाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. या सिझनमध्ये सहभागी होणाऱ्या टीमनी त्यांच्या कॅप्टनची (Captain) नावे नुकतीच घोषित केली आहेत. नव्या कर्णधारांची यादी बघता बहुतांश टीमनी आपले कॅप्टन बदलल्याचं दिसून येत आहे.

प्रो-कबड्डी ही भारतातील व्यावसायिक कबड्डी लीग आहे. 2014 मध्ये ही लीग लॉंच करण्यात आली. प्रो-कबड्डीचा 8 वा सिझन कोविड-19 महामारीमुळे (Pandemic) पुढे ढकलण्यात आला होता आणि आता तोच सिझन 22 डिसेंबर 2021 पासून सुरू होत आहे. प्रो-कबडडी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीमचे मालक हे उद्योगपती, सेलिब्रिटी असल्याने या लीगकडे क्रीडा क्षेत्राचं विशेष लक्ष असतं. यंदाच्या सिझनमधील सर्व मॅचेस बेंगळुरूमधील (Bengaluru) शेरेटन ग्रँड व्हाईटफिल्ड येथे खेळल्या जाणार आहेत.

प्रो-कबड्डीचा 8 वा सिझन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सुमारे 2 वर्षांनंतर कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडा रसिक आतूर झाले आहेत. या सिझनमध्ये एकूण 12 टीम सहभागी होत आहेत. सर्व टीमनी (Teams) आपपल्या कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती प्रो-कबड्डीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रो-कबड्डी लीग 2021 चे कॅप्टन

- बेंगळुरू बुल्स– पवनकुमार सेहरावत

- गुजरात जायंट्स– सुनील कुमार

- जयपूर पिंक पॅंथर्स– दीपक निवास हुड्डा

- यू मुंबा– फजल अत्राचली

- दबंग दिल्ली– जोगिंदर नरवाल

- पटना पायरेटस– प्रशांत कुमार रॉय

- यूपी योध्दा– नितेश कुमार

- तमिळ थलायवाज– सुरजित सिंह

- पुणेरी पलटण– नितीन तोमर

- बंगाल वॉरियर्स– महेंद्र सिंह

- तेलुगू टायटन्स- रोहित कुमार

- हरियाणा स्टिलर्स- अजून निश्चित नाही

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league