मुंबई, 7 ऑक्टोबर: भारतीय कबड्डीच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंटला आजपासून सुरुवात होणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीझनचं बिगुल आज वाजणार आहे. बंगळुरुच्या कांतिरवा इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. गतविजेते दबंग दिल्ली आणि यू मुंबा या संघांमध्ये सलामीची लढत होणार आहे. किती संघ, कुठे होणार सामने? प्रो कबड्डी लीगच्या या सीझनमध्ये 12 टीम्सनी सहभाग घेतला आहे. जयपूर पिंक पँथर्स, पटना पायरेट्स, पुणेरी पलटन, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टिलर्स, बंगाल वॉरियर्स, तामिळ थलाईवाज, यू मुंबा, बंगळुरु बुल्स, दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा या टीम्स स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच राऊंडमध्ये एकूण 66 सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये दिवसाला दोन किंवा तीन सामने पार पडणार आहेत. हे सामने बंगळुरु, पुणे आणि हैदराबादमध्ये होतील.
The Grind 💪
— ProKabaddi (@ProKabaddi) October 7, 2022
The Hustle 👊
The Panga 🙌
The battle for the 🏆 begins soon ⏳#vivoProKabaddi Season 9 starts today, 7:30 PM onwards, LIVE only on the Star Sports Network and Disney+Hotstar! 😍#FantasticPanga #DELvMUM #BLRvTT #JPPvUP pic.twitter.com/Tb1Jggg1Db
स्टेडियममध्ये चाहत्यांना एन्ट्री कबड्डीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे आता स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रेक्षकांविनाच प्रो कबड्डीचे सामने रंगले होते. पण यंदा मात्र तशी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामने बंगळुरुत, दुसरा टप्पा पुण्यात तर तिसऱ्या टप्प्यातील सामने हैदराबादमध्ये होणार आहेत.
THE WAIT IS FINALLY OVER 🤩
— ProKabaddi (@ProKabaddi) October 4, 2022
𝐀𝐟𝐭𝐞𝐫 𝟯 𝐲𝐞𝐚𝐫𝐬, 𝟭𝟬𝟴𝟮 𝐝𝐚𝐲𝐬 𝐚𝐧𝐝 an 𝗲𝗻𝗱𝗹𝗲𝘀𝘀 𝐰𝐚𝐢𝐭..... we open the doors to fans for #FantasticPanga 🙌
Book your #vivoProKabaddi Season 9 tickets exclusively on Book My Show! pic.twitter.com/n6IKMNnIhJ
पहिल्याच दिवशी तीन सामने बंगळुरुत आज स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सामने होणार आहेत. गतविजेते दबंग दिल्ली आणि यू मुंबा या संघांमध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर बंगळुरु बुल्ससमोर तेलुगु टायटन्सचं आव्हान असेल आणि शेवटचा सामना होईल तो जयपूर पिंक पँथर्स आणि यूपी योद्धाजमध्ये. हेही वाचा - Ind vs SA ODI: एका बॉल बॉयमुळे भारतीय खेळाडू झाले ट्रोल… पाहा लखनौ वन डेत नेमकं काय घडलं? कुठे होणार प्रसारण? स्टार स्पोर्टस नेटवर्कवर प्रो कबड्डी लीगचे सामने पाहता येणार आहेत. स्टार स्पोर्टस 2, स्टार स्पोर्ट 1 या चॅनेल्सवर हिंदी आणि इंग्लिशसह अन्य भाषांमध्येही याचं प्रक्षेपण होणार आहे. सामन्याची वेळ काय? प्रो कबड्डी लीगचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील. पहिला सामना संपल्यानंतर लागोपाठ दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाईल. हेही वाचा - Ind vs SA ODI: लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले ‘हे’ प्रमुख अडथळे लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवर होईल. शिवाय जिओ अॅपवरही लाईव्ह मॅचचा आनंद घेता येईल.