मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Pro Kabaddi Final : प्रो कबड्डी लीगची फायनल आज, कधी आणि कुठे पाहणार Live?

Pro Kabaddi Final : प्रो कबड्डी लीगची फायनल आज, कधी आणि कुठे पाहणार Live?

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सिझन 8 चा विजेता कोण होणार हे आता काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेची फायनल आज (शुक्रवार) होणार आहे.

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सिझन 8 चा विजेता कोण होणार हे आता काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेची फायनल आज (शुक्रवार) होणार आहे.

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सिझन 8 चा विजेता कोण होणार हे आता काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेची फायनल आज (शुक्रवार) होणार आहे.

मुंबई, 25 फेब्रुवारी : प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सिझन 8 चा विजेता कोण होणार हे आता काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेची फायनल आज (शुक्रवार) होणार आहे. पाटणा पायरेट्स विरूद्ध दबंग दिल्ली  (Patna Pirates vs Dabang Delhi) यांच्यामध्ये ही फायनल होईल. पाटणा ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. तर दिल्लीला अद्याप पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

3 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या पाटणानं सेमी फायनलमध्ये यूपी योद्धाचा पराभव केला. तर सिझन 7 ची उपविजेता असलेल्या दिल्लीनं बेंगलुरू बुल्लसचा पराभव करत सलग दुसऱ्या सिझनमध्ये फायनल गाठली आहे. या सिझनमध्या दोन्ही टीममध्ये दोन वेळा मॅच झाली. त्या दोन्हीमध्ये पाटणानं विजय मिळवला होता.

पाटणाचा दोन्ही मॅचमध्ये दिल्लीने पराभव केला होता य पहिल्या मॅचमध्ये ऑल राऊंडर संदीप नरवालनं जबरदस्त खेळ केला होता. तर दुसऱ्या मॅचमध्ये मंजीत छिल्लरनं हाई 5 करत दिल्लीला विजय मिळवून दिला. आता दोन्ही टीम या सिझनमध्ये तिसऱ्यांदा एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत.

IND vs SL : श्रीलंका विरूद्धच्या मोठ्या विजयानंतरही रोहित शर्मा नाराज, जाणून घ्या कारण

प्रश्न: प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल  (Pro Kabaddi League, Season 8 Final) कधी होणार आहे?

उत्तर :  प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल आज (शुक्रवार, 25 फेब्रुवारी) होणार आहे. रात्री 8.30 वाजता ही मॅच सुरू होईल.

प्रश्न:  प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल  (Pro Kabaddi League, Season 8 Final) कुठे होणार आहे?

उत्तर : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल  (Pro Kabaddi League, Season 8 Final) बेंगलुरूमध्ये होणार आहे.

प्रश्न : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल  (Pro Kabaddi League, Season 8 Final) कुठे Live पाहाता येईल?

उत्तर : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनल  (Pro Kabaddi League, Season 8 Final) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येणार आहे.

प्रश्न : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनलचे  (Pro Kabaddi League, Season 8 Final) Live Streaming पाहाता येईल?

उत्तर : प्रश्न : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या सिझनची फायनलचे (Pro Kabaddi League, Season 8 Final) लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस-हॉटस्टारवर पाहाता येईल.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports