मुंबई, 25 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी20 सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिल्यानंतर टीम इंडियानं श्रीलंका (India vs Sri Lanka T20 Series) विरूद्धच्या सीरिजची सुरूवातही विजयानं केली आहे. लखनऊमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये भारतानं श्रीलंकेचा 62 रननं पराभव केला. या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 199 रन केले. इशान किशननं (Ishan Kishan) 56 बॉलमध्ये 89 रन काढले. तर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) अर्धशतक झळकावले. भारतीय टीमनं मोठा विजय मिळवल्यानंतरही कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज आहे. त्याने मॅचनंतर नाराजी बोलून दाखवली. भारतीय बॅटर आणि बॉलर्सनं दमदार कामगिरी केल्यानंतरही फिल्डर्सनं चांगली कामगिरी न केल्यानं रोहित नाराज झाला. भारतीय फिल्डर्सनं गुरूवारच्या मॅचमध्ये अनेक सोपे कॅच सोडले. त्यावर रोहित म्हणाला की, ‘हे सतत होत आहे. आम्ही सोपे कॅच सोडत आहोत. या प्रकारच्या लेव्हलचं क्रिकेट खेळत असताना चुका अपेक्षित नाहीत. आम्हाला फिल्डिंग सुधारावी लागेल. आमच्या फिल्डिंग कोचला आणखी काम करणे आवश्यक आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी आमचे फिल्डिंग युनिट मजबूत व्हायला हवे. या प्रकारच्या चुकांना आता जागा नाही.’ IND vs SL : चहल बनला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर, बुमराहसह सर्वांना टाकलं मागं रोहितनं यावेळी ओपनर इशान किशनच्या खेळाची प्रशंसा केली. इशाननं 89 रन काढले. हा त्याचा टी20 इंटरनॅशनलधील सर्वोच्च स्कोअर आहे. रोहित त्याच्या खेळाबद्दल म्हणाला की, ‘मी इशानला दीर्घकाळापासून ओळखतो. आम्ही दोघंही मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतो. मला त्याचा माईंडसेट आणि क्षमता माहिती आहे. इशानला फॉर्म गवसणे आवश्यक होते. त्याची बॅटींग दुसऱ्या साईडनं पाहून छान वाटले. त्याने 6 ओव्हरनंतर त्याची इनिंग सावरली. हे त्याच्यासाठी सहसा आव्हान असते. त्याला फटकेबाजी करायला आवडते, हे आपल्याला माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







