Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PKL : बाबर आझमपेक्षाही जास्त पगार असलेला कबड्डीपटू यंदाच्या सिझनमध्ये फेल

PKL : बाबर आझमपेक्षाही जास्त पगार असलेला कबड्डीपटू यंदाच्या सिझनमध्ये फेल

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझननं आता वेग पकडला आहे. या सिझनमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमपेक्षा (Babar Azam) जास्त पगार घेणारा कबड्डीपटू फेल गेला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 जानेवारी :  प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझननं आता वेग पकडला आहे.  रोज होणाऱ्या मॅचनंतर पॉईंट टेबलमध्ये वेगानं बदल होत आहेत. प्रो कबड्डीच्या प्रत्येक सिझननंतर नवे स्टार उदयास येतात. दबंग दिल्लीच्या नवीन कुमारनं (Naveen Kumar) या सिझनमध्येही धडाकेबाज खेळ करत 5 मॅचनंतर सर्वात जास्त 73 रेड पॉईंट्स मिळवले आहेत. पीएकेलमधील 'नवीन एक्स्प्रेस'  जोरात असताना या स्पर्धेतील सर्वात मोठा सुपरस्टारनं आजवरच्या सामन्यात निराशा केली आहे.

प्रो कबड़्डी लीगच्या इतिहासातील सर्वात मोठा सुपर स्टार असलेल्या प्रदीप नरवालनं (Pradeep Narwal) 6 मॅचनंतर फक्त 33 रेड पॉईंट्स मिळवले आहेत. सर्वाधिक रेड पॉईंट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सध्या नवव्या क्रमांकावर आहे. प्रदीपच्या या खराब खेळाचा फटका यूपी योद्धालाही बसला आहे. यूपी योद्धानं 6 मॅचनंतर अवघा विजय मिळवला असून 3 सामन्यात त्यांना बरोबरी पत्कारावी लागली आहे. यूपीची टीम 14 पॉईंट्ससह सध्या आठव्या क्रमांकावर आहे.

प्रदीप नरवाल हा पीकेएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर आहे. पाटणा पायरेट्सच्या विजेतेपदामध्ये प्रदीपच्या खेळाचा मोठा वाटा होता. 'डुबकी किंग' अशी ओळख असलेल्या प्रदीपला  यूपी योद्धाने यंदा  1.65 कोटी रुपयांना विकत घेतलं. लीगच्या इतिहासातला तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. प्रदीपचा पगार पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळणाऱ्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपेक्षाही अधिक आहे.

बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) कराची सुपर किंग्सकडून (Karachi Kings) खेळचो. मागच्या मोसमात टीमने त्याला प्लॅटिनम कॅटेगरी खेळाडूमध्ये ठेवलं होतं. पीएसएलमध्ये प्लॅटिनम कॅटेगरी खेळाडूंना 1.7 लाख डॉलर म्हणजेच 1.24 कोटी रुपये मिळतात. कराचीने या मोसमात बाबरला कर्णधार केलं आहे.

Pro Kabaddi : कसा सुरू झाला 'नवीन एक्स्प्रेस'चा प्रवास, स्टार रेडरनं बदलला स्पर्धेचा इतिहास

प्रदीपचा आजवरचा अनुभव पाहाता त्याला यंदाच्या लिलावात मोठी किंमत मिळाली. आजवर एकही विजेतेपद न पटकावणाऱ्या यूपी योद्धाला प्रदीपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र त्यानं यंदा निराश केले आहे.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league