मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Pro Kabaddi : कसा सुरू झाला 'नवीन एक्स्प्रेस'चा प्रवास, स्टार रेडरनं बदलला स्पर्धेचा इतिहास

Pro Kabaddi : कसा सुरू झाला 'नवीन एक्स्प्रेस'चा प्रवास, स्टार रेडरनं बदलला स्पर्धेचा इतिहास

Pro Kabaddi League : कबड्डी फॅन्समध्ये 'नवीन एक्स्प्रेस' म्हणून फॅन्समध्ये प्रसिद्ध असलेला नवीन कुमार (Naveen Kumbar) कबड्डीकडे कसा वळला याचा इतिहास मोठा रंजक आहे.

Pro Kabaddi League : कबड्डी फॅन्समध्ये 'नवीन एक्स्प्रेस' म्हणून फॅन्समध्ये प्रसिद्ध असलेला नवीन कुमार (Naveen Kumbar) कबड्डीकडे कसा वळला याचा इतिहास मोठा रंजक आहे.

Pro Kabaddi League : कबड्डी फॅन्समध्ये 'नवीन एक्स्प्रेस' म्हणून फॅन्समध्ये प्रसिद्ध असलेला नवीन कुमार (Naveen Kumbar) कबड्डीकडे कसा वळला याचा इतिहास मोठा रंजक आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) सध्या आठवा सिझन सुरू आहे. या लीगनं खूप कमी कालावधीमध्ये कबड्डीचा चेहरा बदलला आहे. अनेक नव्या खेळाडूंचा उदय या लीगमधून झाला असून तरूण खेळाडूंना दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. या स्पर्धेतून उदयाला आलेला एक मोठा स्टार आहे, नवीन कुमार (Naveen Kumar).  दबंग दिल्लीचा मुख्य रेडर असलेल्या नवीननं नुकताच प्रो कबड्डूीच्या इतिहासातील एक रेकॉर्ड केला आहे. 'नवीन एक्स्प्रेस' म्हणून फॅन्समध्ये प्रसिद्ध असलेला नवीन कुमार कबड्डीकडे कसा वळला याचा इतिहास मोठा रंजक आहे.

नवीन कुमारनं यू मुंबा (U Mumba) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 16 रेड पॉईंट्स कमावले. प्रो कबड्डी लीगमध्ये सलग 23 व्या मॅचमध्ये नवीननं सुपर 10 ची कमाई केली आहे. तसेच स्पर्धेच्या इतिहासात 500 पॉईंट्सही पूर्ण केले आहेत. सर्वात कमी मॅचमध्ये (47) नवीननं हा टप्पा ओलांडला आहे. सातत्याने 'सुपर 10' ची कमाई करणाऱ्या नवीन कुमार त्याच्या फॅन्सनी 'नवीन एक्स्प्रेस' हे नाव दिले आहे.

कशी मिळाली प्रेरणा?

हरियाणातील भिवानीच्या नवीनला या प्रवासात त्याच्या कुटुंबाची मोठी मदत मिळाली आहे. त्यानं गावात मुलांना कबड्डी खेळताना पाहिले आणि तो खेळानं प्रभावित झाला. कबड्डीपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आजोबांनी मोठी मदत केली. खेळ किंवा अभ्यास जे काही करशील ते मन लावून कर, असा सल्ला कुटुंबीयांनी नवीनला दिला होता.

नवीननं शाळेतील स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत घरच्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच्या कबड्डीपटू होण्याच्या प्रवासाला वेग मिळाला. नवीननं एशियन गेम्समध्ये भारतीय टीमला गोल्ड मेडल जिंकलेलं पाहिलं आहे. त्याला देखील देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्याच्या या स्वप्नांना प्रो कबड्डीनं बळ दिलं. दबंग दिल्ली (Dabang Delhi) टीमनं नवीनला करारबद्ध केलं. तो अगदी कमी कालावधीत टीमचा मुख्य रेडर बनला आहे.

मुंबईला आज टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी, कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?

नवीनचा धडाका

नवीन कुमारनं मागील सिझनमध्ये (PKL Season 7) जोरदार कामगिरी करत दिल्लीला फायनलपर्यंत नेले होते. फायनलमध्ये बंगाल वॉरियर्सनं त्यांचा पराभव केला आहे. मागील सिझनमध्ये थोडक्यात हुकलेलं विजेतेपद यंदा मिळवण्याच्या उद्देशानं नवीन आणि दिल्लीची टीम स्पर्धेत उतरली आहे.

नवीन कुमारनं पहिल्या 3 मॅचमध्ये 39 पॉईंट्स मिळवले आहेत. त्याच्या खेळामुळे दिल्लीची टीम 13 पॉईंट्ससह सध्या नंबर 1 वर आहे. दिल्लीला या लीगचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी नवीनचा फॉर्म निर्णायक ठरणार आहे.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports