नवी दिल्ली, 19 जून: भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. (Milkha Singh dies of Covid-19) 17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते.
Legendary Indian sprinter Milkha Singh dies after month long battle with COVID-19: Family spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2021
मिल्खा सिंग यांच्या कूक ला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर त्यांना आणि पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला. दिग्गज मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं निधन मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधानाने आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक जुना फोटोही ट्विट केला आहे.
I had spoken to Shri Milkha Singh Ji just a few days ago. Little did I know that it would be our last conversation. Several budding athletes will derive strength from his life journey. My condolences to his family and many admirers all over the world.
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
पंतप्रधानांनी ट्विट करत पुढे म्हटलं, मी काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्यासोबत बोललो होतो. ते आमचे शेवटचे संभाषण ठरेल हे माहिती नव्हते. अनेक नवोदित अॅथलेटिक्स हे मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील प्रवासातून प्रेरणा मिळवतात. मिल्खा सिंग यांचा अल्प परिचय मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.