मुंबई, 24 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील 2 सामने नागपूर आणि दिल्ली येथे पारपडले असून या सामन्यात भारताने विजय मिळून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. 1 मार्च पासून भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार असून याआधीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला सध्या दुखापतीच ग्रहण लागलं असून अनेक क्रिकेटपटू दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडत आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने देखील परतीची वाट धरली असून तो १ मार्च पासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात संघाचा भाग नसेल. पॅट कमिन्सला त्याच्या कौटुंबिक कारणामुळे हा निर्णय घ्यावा लागला असून त्याच्या आईची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. 23 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली स्मृती मानधना; स्वतःच केला खुलासा कर्णधार पॅट कमिन्सपूर्वी डेव्हिड वॉर्नर, ॲश्टन ॲगर, जोश हेझलवूड, टॉड मर्फी, मिचेल स्वेपसन, लान्स मॉरिस आणि मॅथ्यू रेनशॉ हे खेळाडू दुखापतीमुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर पडले आहेत, तर काही बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार कमिन्सने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.
कमिन्सच्या आईची प्रकृती जास्त गंभीर असल्याने अशा वेळी त्याने आईसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सांगितले की, “मी सध्या भारतातून पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. मला वाटते मी याक्षणी माझ्या कुटुंबियांसोबत असायला हवे, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि माझ्या सहकाऱ्यांकडून मला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याचे मी कौतुक करतो. तुम्ही दाखवलेल्या समजुतीबद्दल धन्यवाद.”
🚨 JUST IN: Pat Cummins to miss the third #INDvAUS Test as Australia name replacement captain.
— ICC (@ICC) February 24, 2023
Details ⬇️#WTC23 https://t.co/HMD0lqWO7m
1 मार्च ते 5 मार्च या दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोर येथील होळकर स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.