• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • अलीच्या हातून ‘तो’ झेल सुटताच पाकिस्तानी फॅन्सनी अलीसह बायकोलाही केले ट्रोल म्हणाले, रॉ एजंट

अलीच्या हातून ‘तो’ झेल सुटताच पाकिस्तानी फॅन्सनी अलीसह बायकोलाही केले ट्रोल म्हणाले, रॉ एजंट

hasan ali and wife

hasan ali and wife

नाराज पाकिस्तानच्या फॅन्सनी हसन अलीसह (hasan ali) त्याची बायकोलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण त्याची बायको ही भारतीय वंशाची आहे.

 • Share this:
  दुबई, 12 नोव्हेंबर: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. अशातच क्रिकेट जगतात पाकिस्तानच्या (Pakistan) पराभवसोबत 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीकडून सुटलेल्या झेलची चर्चा अधिक रंगली आहे. त्याचा सुटलेला हा झेल पाकिस्तानसाठी टर्निंग पॉइंट ठरला असता. पण पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास तिथेच संपुष्टात आला. यावरुन नाराज पाकिस्तानच्या फॅन्सनी हसन अलीसह (hasan ali) त्याची बायकोलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण त्याची बायको ही भारतीय वंशाची आहे. पाकिस्तानने दिलेलो 177 रनचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 विकेट आणि एक ओव्हर राखून पार केलं. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात टर्निंग पाँईट ठरला म्हणजे हसन अलीने सोडलेला कॅच. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला. आणि त्याचा सुटलेला झेल ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचा ठरला. पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास तिथेच संपुष्टात आला. त्यानंतर पाकिस्तानच्या फॅन्सनी हसन अली आणि त्याच्या बायकोला ट्रोल करण्यात येत आहे. कारण ती भारतातील आहे. काही चाहते त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत, तर काहींचे म्हणणे आहे की त्याला विश्वचषक खेळण्याची संधी द्यायला नको होती. काही लोकांनी त्याला शिया असल्याने ट्रोलही केले. हसन अलीने 2019 मध्ये भारतीय वंशाच्या सामिया आरजूशी लग्न केले. चाहत्यांनी त्याच्या पत्नीला रॉ एजंट असल्याचेही म्हटले आहे.

  गोलंदाजीतही हसन अली कमाल करू शकला नाही

  गोलंदाजीतही हसन अली काही विशेष करू शकला नाही आणि त्याने चार षटकात एकही विकेट न घेता 44 धावा दिल्या. डावाच्या 18व्या षटकात या वेगवान गोलंदाजाने स्टॉइनिस आणि वेडला 15 धावा दिल्या, ज्याचा परिणाम पुढच्या षटकात स्पष्टपणे दिसून आला. तोपर्यंत वेड चांगल्या लयीत होता आणि त्याने शाहीन आफ्रिदीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून एक षटक आधी संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ असेल. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. 14 नोव्हेंबर रोजी दुबईत हा सामना रंगेल.
  Published by:Dhanshri Otari
  First published: