जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / AUS vs PAK सामन्यात 'भारत माता की जय' ची घोषणा? VIRAL झालेला हा VIDEO फेक

AUS vs PAK सामन्यात 'भारत माता की जय' ची घोषणा? VIRAL झालेला हा VIDEO फेक

AUS vs PAK

AUS vs PAK

क्रिकेट जगतातून ऑस्ट्रेलिया संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरोधातील मॅच जिंकल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाने गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan Semi Final) पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. क्रिकेट जगतातून ऑस्ट्रेलिया संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 30 बॉलमध्ये 49 रन केले. पाकिस्तानकडून शादाब खानला 4 आणि शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली. पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. या विजयानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ‘भारत माता की जय’ (Bharat Mata Ki Jay) आणि वंदे मातरम (Vande Matram) अशा घोषणा देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ याच सामन्यातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अनेकांनी याबाबत पोस्ट देखील केल्या आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना असून या सामन्याशी त्याचा काही संंबंध नाही आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र BOOM Live ने केलेल्या फॅक्ट चेकनुसार, जानेवारी 2021 मध्ये Gabba सीरिजमध्ये डॉ. आशुतोष मिश्रा नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनीच हा व्हिडीओ शूट केल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. याशिवाय काही मीडिया आउटलेट्सनी देखील हा व्हिडीओ त्यावेळचा असल्याचे म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात