ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर: ख्राईस्टचर्चची शेवटची वन डे पावसामुळे रद्द झाली. त्यासोबतच टीम इंडियानं वन डे मालिका 0-1 अशा फरकानं गमावली. टी-20 सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाची वन-डेमधील कामगिरी मात्र, सुमार राहिली आहे. नुकत्याच संपलेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर आता वन-डे वर्ल्ड कपचं काउंटडाउन सुरू झालं आहे. टीम इंडियाची सध्याची परिस्थिती बघता टीमच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वन-डे वर्ल्ड कप अवघ्या 10 महिन्यांवर येऊन ठेपला असताना आता टीम इंडिया कशी तयारी करणार? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात येत आहे.
10 महिन्यांत कशी होणार तयारी पूर्ण?
2023 मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये भारतात वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. सप्टेंबरपर्यंत टीमची घोषणा केली जाईल. परंतु, सध्या टीम इंडियाकडे निश्चित वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करू शकतील अशा 15 खेळाडूंची कमतरता आहे. यामुळेच टीम इंडियाला सर्वांत अगोदर आपले 15 खेळाडू ठरवावे लागतील, जेणेकरून ते तयारी सुरू करू शकतील. नाहीतर पुन्हा एकदा 2021 आणि 2022 टी-20 वर्ल्ड कपसारख्या चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावू शकते.
Match Abandoned at Hagley Oval. The result means the team will take the Sterling Reserve ODI Series 1-0. Scorecard | https://t.co/4RzQfImu7X #NZvIND pic.twitter.com/gC1H8ze46s
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 30, 2022
'या' गोंधळावर सोल्युशन गरजेचं
वन-डे वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया भरपूर मॅचेस खेळणार आहे. पण, सध्या प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली असे अनेक प्रयोग केले जात आहेत की त्यामुळे टीम इंडियाचा कोअर ग्रुप कोणता असेल हे ठरवणं कठीण झालं आहे. कॅप्टन रोहित शर्मा, माजी कॅप्टन विराट कोहली, व्हाइस कॅप्टन के. एल. राहुल यांसारखे वरिष्ठ खेळाडू वारंवार ब्रेक घेत आहेत. ते फक्त मोठ्या सीरिज खेळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या फॉर्ममध्ये सातत्य कसं राहणार? हा मोठा प्रश्न आहे.
टी- 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कॅप्टन होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी हार्दिक पंड्याला कॅप्टन केलं तर वन-डे टीमची जबाबदारी शिखर धवनकडे दिली. आता बांगलादेश दौऱ्यात पुन्हा रोहित शर्माकडे कॅप्टन्सी दिली जाणार आहे. सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिल्यानं प्लेईंग कॉम्बिनेशनही वारंवार बिघडत आहे.
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: महाराष्ट्राचं रनमशिन... वर्ल्ड रेकॉर्डनंतर पठ्ठ्यानं अवघ्या तीन दिवसात ठोकलं दुसरं शतक
बिघडलेलं कॉम्बिनेशन
वन-डे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत के. एल. राहुल ओपनिंग करणार की शिखर धवन, हे अद्याप ठरलेलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये हे तिन्ही खेळाडू एकत्र खेळलेले नाहीत ही चिंतेची बाब आहे. अनेक वन-डे सीरिजमध्ये शिखर धवन भारताचं नेतृत्व करताना तर रोहित शर्मा विश्रांती घेताना दिसला आहे. अशा परिस्थितीत ओपनिंग जोडी किंवा टॉप तीन खेळाडू निवडणं मोठी अडचण ठरणार आहे. ओपनिंग जोडी प्रमाणे विकेट कीपिंगच्याबाबतीतही चिंता वाढली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. तो सातत्याने अपयशी ठरूनही त्याला संधी मिळत आहे. त्याच्याऐवजी संजू सॅमसन, ईशान किशन किंवा अन्य कोणत्याही खेळाडूला संधी देण्याचे प्रयत्न केले जात नाहीत.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी पण इतरांचं काय? तिसऱ्या वन डे टीम इंडियाची पाहा काय झाली अवस्था...
वन-डे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल हे निश्चित असलं तरी त्याचा बॅटिंग फॉर्म संघासाठी अडचणी निर्माण करत आहे. राहुलचा स्ट्राईक रेटही चिंता वाढवणारा आहे. राहुलला टीममध्ये स्थान मिळालं तर शिखर धवनसाठी अडचण निर्माण होत आहे. टी-20 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला वन-डे क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागेल. श्रेयस अय्यर वन-डेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
या शिवाय रवींद्र जडेजाचं पुनरागमन आणि हार्दिक पंड्याचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, स्पिन बॉलिंगसाठी टीम इंडियाला युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. जसप्रीत बुमराह, अर्शदीपसिंग आणि उमरान मलिकसारखे खेळाडू फास्ट बॉलिंग सांभाळू शकतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports