मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /लग्नात गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे शाहीन आफ्रिदी भडकला; पाहा काय आहे नेमके प्रकरण?

लग्नात गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे शाहीन आफ्रिदी भडकला; पाहा काय आहे नेमके प्रकरण?

कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा यांचा विवाह सोहोळा पारपडला.  परंतु लग्नात काही गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे नवरदेव शाहीन आफ्रिदी चांगलाच भडकला.

कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा यांचा विवाह सोहोळा पारपडला. परंतु लग्नात काही गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे नवरदेव शाहीन आफ्रिदी चांगलाच भडकला.

कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा यांचा विवाह सोहोळा पारपडला. परंतु लग्नात काही गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे नवरदेव शाहीन आफ्रिदी चांगलाच भडकला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 जानेवारी : पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी लग्नबंधनात अडकला. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अंशा हिच्याशी निकाह केला. क्रिकेट विश्वातील या लग्नाची सध्या बरीच चर्चा असून या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वजण नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. परंतु लग्नात काही गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे नवरदेव शाहीन आफ्रिदी चांगलाच भडकला. त्याने याबाबत ट्विट करून आपला संताप व्यक्त केला.

कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांचा विवाह सोहोळा पारपडला. या सोहोळ्याला पाकिस्तान क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंची हजेरी होती. मुस्लिम पद्धतीने या दोघांचा विवाह पारपडला असून याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच कारणामुळे शाहीन आफ्रिदीचा संताप झाला. त्याने सुरुवातीला त्याच्या लग्नाची बातमी आणि काही फोटो ट्विट करून त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. परंतु त्या खालोखाल त्याने निराशा देखील व्यक्त केली.

शाहीनने ट्विट करत लिहिले, "हे खूप निराशाजनक आहे की अनेकदा आणि वारंवार विनंती करूनही, आमच्या गोपनीयतेला धक्का बसला आणि लोक कोणत्याही अपराधीपणाशिवाय आमच्या लग्न सोहोळ्यातील आमचे फोटोस पुढे शेअर करत राहिले. मी सर्वांना पुन्हा नम्रपणे विनंती करू इच्छितो की कृपया आमच्याशी समन्वय साधा आणि आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि मोठा दिवस खराब करण्याचा प्रयत्न करू नका".

हे ही वाचा : पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा निकाह; माजी कर्णधाराचा बनला जावई

खरंतर शाहीन आणि अंशा यांच्या लग्नात परिवाराने सर्व पाहुण्यांना त्यांचा फोन बंद ठेवण्याची विनंती केली होती. समारंभ स्थळाच्या प्रवेशद्वारावर देखील तशा सुचना लिहिल्या होत्या. मात्र या सुचनेनंतरही शाहीनच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Pakistan Cricket Board, Shahid Afridi